ETV Bharat / city

Ambani Threat Call : एकाच दिवसात दोन वेळा रिलायन्स रुग्णालयाला धमकीचे कॉल, अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी - Ambani family

रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली (Bomb threat to Reliance Foundation Hospital) आहे. एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन काल दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी आला होता. त्यामध्ये रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची आली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी रिलायन्स हॉस्पिटलला धमकीचा फोन (Reliance Foundation Hospital Threat) आला. त्यात अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Ambani Threat Call
रिलायन्स रुग्णालयाला धमकीचे कॉल
author img

By

Published : Oct 6, 2022, 7:11 AM IST

मुंबई : रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली (Bomb threat to Reliance Foundation Hospital) आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन काल दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी आला होता. त्यामध्ये रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबीयांनाही धमकी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी रिलायन्स हॉस्पिटलला धमकीचा फोन (Reliance Foundation Hospital Threat) आला. या फोनवरून रिलायन्स हॉस्पिटल आणि अँटिलीया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

दुसऱ्यांदा धमकीचा फोन : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी १२.५७ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डीबी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. या धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (death threats threats to Mukesh Ambani family) आली. तसेच त्यांचे निवासस्थान असलेले अँटिलिया ही इमारत देखील उडवून देण्यात येईल धमकी देण्यात आली.

कॉलर विरोधात गुन्हा दाखल - याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात कॉलर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी (threats call police investigation) सांगितले. मात्र, एकाच दिवसात दोन वेळा रिलायन्स रुग्णालयाला धमकीचे कॉल आल्याने एकच खळबळ माजली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.