ETV Bharat / city

Nepotism In Regional Parties प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाहीवरचा हा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट - Modi Comment On nepotism in regional parties

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाही वक्तव्य केल असून यामुळे देशातील कर्तृत्ववान व्यक्तींना राजकारणापासून दूर राहावे लागत असल्याबाबत म्हटल आहे Nepotism In Regional Parties देशभरात असलेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये खास करून घराणेशाही पाहायला मिळते देशभरातील कोणत्या प्रादेशिक पक्षांमध्ये विशिष्ट कुटुंबाचा दबदबा आहे महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षावर कुटुंबाचा दबदबा पाहायला मिळतो

प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाही
प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाही
author img

By

Published : Aug 16, 2022, 10:02 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दरम्यान राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवल आहे. केवळ राजकीय घराण्यातला व्यक्ती आहे त्यामुळे राजकारणात संधी मिळते त्यामुळे आता देशामध्ये घराणेशाही चालणार नाही कर्तुत्ववान असेल त्यालाच राजकारणात पुढे यायची संधी मिळावी असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहेत Nepotism In Regional Parties त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राजकारणातील घराणेशाहीवरच्या वक्तव्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत

राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा डाव खासकरून देशातील प्रादेशिक पक्षांमध्ये कुटुंबांचे प्रभुत्व पाहायला मिळते जवळपास प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाची एक वेगळी अस्मिता आहे त्या अस्मितेवर आधारावर या प्रादेशिक पक्षांची निर्मिती झाली असून पक्षांमध्ये एखाद्या विशिष्ट कुटूंबाचा प्रभुत्व जाणवत त्याच कुटुंबाच्या सदस्याकडे त्या पक्षाची धुरा असलेली पाहायला मिळते त्या पक्षाच्या इतर नेतेमंडळी पक्षाच्या सर्वोच्च स्थानी पोहताना फारच कमी वेळा पाहायला मिळते त्यामुळे राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणायची आहे का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या राजकीय कुटुंबांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे

शिवसेना महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये घराणेशाही सुरू असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे महाराष्ट्र शिवसेना या पक्षाची धुरा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आता आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाले असून पक्ष ते सांभाळतील अशीच चिन्ह आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पक्ष सुरू केला असून आता शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे यांचे पक्षांमध्ये सर्वात जास्त वजन आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही देशात घराणेशाही नाही तर लोकशाही आहे कर्तृत्व असेल तरच एखादी व्यक्ती जनतेच प्रतिनिधित्व करू शकेल ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे अशा कुटुंबातील सदस्यांना राजकारणात आपल्या कर्तुत्वावर काम कराव असे वाटत असेल तर लोकशाहीने दिलेला त्यांना तो अधिकार आहे त्या व्यक्तीच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना निवडून देत असेल तर ही लोकशाही असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा खंडन केले आहे

देशभरात कोणत्या राजकीय पक्षात घराणेशाहीचा आरोप होतो? तामिळनाडू डीएमके पक्ष करुणानिधी यांच्या कुटुंबाचा प्रभाव पक्षावर असून त्यांच्यानंतर एम के स्टॅलिन यांचे प्रभुत्व या पक्षावर आहे एमके स्टॅलिन आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री देखील आहेत

आंध्रप्रदेश- तेलगू देसम पक्ष आंध्र प्रदेश मधील चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबाचा तेलगू देसम पक्षावर प्रभुत्व आहे तर तेथेच वाय एस आर पक्षाचा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा दबदबा आहे

तेलंगणा- तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा तेलंगणा राष्ट्र समिती पक्षावर पूर्णपणे नियंत्रण आहे त्यांचे कुटुंबीय पक्षाची विविध महत्त्वाची पद भूषवत आहेत

कर्नाटक- जनता दल सेक्युलर या पक्षावर देवेगौडा कुटुंबाचे प्रभुत्व आहे एच के देवेगौडा ते पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचे पुत्र कुमार स्वामी हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत

ओडीसा - बिजू जनता दल पक्षावर पटनायक कुटुंबाचा प्रभुत्व असून जेष्ठ नेते विजू पटनायक नंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत

पश्चिम बंगाल- तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पक्षामध्ये की घराणेशाहीचा आरोप केला जातो ममता बॅनर्जी यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षांमध्ये दबदबा आहे

मेघालय - राष्ट्रीय लोक पक्ष पक्षावर सांगता कुटुंबात प्रभुत्व असून पी ए संगमा आणि कॉनराड संगमा यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे

झारखंड -झारखंड मुक्ती मोर्चा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांनी मुख्यमंत्री पदासहित पक्षाची धुरा सांभाळली आहे त्यांच्या आधी हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांचा पक्षाचे अध्यक्ष होते

बिहार- आरजेडी बिहार राज्यात आरजेडी पक्ष नुकताच सत्तेत आला आहे पक्षाचे तरुण नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सध्या आरजेडी पक्षाचे सर्वस्व म्हणून तेजस्वी यादव यांच्याकडे पाहिले जाते याआधी जेष्ठ नेते लालूप्रसाद यादव त्यांच्याकडे या पक्षाची सर्वाधिकार होते

उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात प्रभावी असलेल्या समाजवादी पक्ष हा आधी मुलायम सिंह यादव यांच्या नियंत्रणाखाली काम करत होता मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी या पक्षाची सर्व धुरा आपल्या हातात घेतली

पंजाब -अकाली दल पंजाबच्या प्रभावशाली असलेला अकाली दल पक्ष बादल कुटुंबाच्या नियंत्रणात आहे प्रकाशसिंह बादल हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आता सुखविंदर सिंह बादल यांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे

जम्मू-काश्मीर - पीडीपी जम्मू-काश्मीर राज्यामध्ये पीडीपी पक्षाची जबाबदारी सध्या मेहबूबा मुफ्ती या संभाळत आहेत भाजपशी युती करून त्या राज्याच्या मुख्यमंत्री देखील होत्या पक्षामध्ये मुफ्ती मोहम्मद सईद हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्यानंतर या पक्षाची धुरा मेहबूबा मुफ्ती यांनी सांभाळली आहे तर जम्मू कश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षात अब्दुल्ला कुटुंब सर्वोच्च आहे फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांचे पक्षावर पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळते

पक्षामध्ये असलेली घराणेशाही ती मोडून काढली पाहिजे याबाबत सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून आवाज उठवला जातो काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष हे कुटुंबाची जहांगीरी झाले आहे प्रत्येक प्रादेशिक पक्षावर एका विशिष्ट कुटुंबाचे प्रभुत्व असल्याचे वक्तव्य केले होते तसेच या प्रादेशिक पक्षांमध्ये कौटुंबिक कलह पाहायला मिळतो महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांची उदाहरणे देत ही पक्ष भारतीय जनता पक्षासमोर आता टिकणार नाहीत असे संकेत दिले होते त्यानंतर भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्ष संपवण्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी सहित देशातील इतर प्रादेशिक पक्षाने देखील केला होता त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाही संपुष्टात येण्याबाबत वक्तव्य केल असला तरी त्यांना देशातील प्रादेशिक पक्ष संपवायची आहेत असा आरोप केला जातं आहे

हेही वाचा - यापूर्वीही विनायक मेटेंच्या गाडीचा झाला होता पाठलाग, पत्नी स्वाती मेटेंनी केली चौकशीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.