ETV Bharat / city

Cases Against Bullock Cart Owners : बैलगाडा मालकांवरील गुन्ह्यांची राज्य सरकारने मागवली माहिती

राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतची माहिती गृह विभागाने मागवली आहे. मात्र, न्यायालयाच्या नियमांत बसणारेच गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मंत्रालय
मंत्रालय
author img

By

Published : Mar 28, 2022, 9:23 PM IST

मुंबई - राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतची माहिती गृह विभागाने मागवली आहे. मात्र, न्यायालयाच्या नियमांत बसणारेच गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बैलगाडा शर्यतीला बंदी घातल्यानंतर बैलगाडा मालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आहे. त्यामुळे बंदी काळात बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा शर्यती अंतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती गृह विभागाने मागवली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना तर पोलीस आयुक्तांना थेट गृहखात्याला माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गृह खात्याकडून सर्व गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर करण्यात येणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार नियमात बसणारे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.

हेही वाचा - Tree Cutting At Jogeswari : जोगेश्वरी येथे झाडांच्या मुळावर घाव; इस्माईल युसूफ काॅलेजजवळील घटना, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.