मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला 100 ते 200 रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन आज २३ डिसेंबरला ६०२ नव्या रुग्णांची नोंद झाली ( Covid Spread In Mumbai ) आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला ( Covid Patients Death In Mumbai ) असून, 208 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
साडे सात लाख रुग्ण झाले बरे
मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ६८ हजार ७५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ४६ हजार ९९१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २८१३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के ( Covid Recovery Rate Mumbai ) तर, रुग्ण दुपटीचा कालावधी १७४७ दिवस इतका आहे. मुंबईमधील १३ इमारती सील करण्यात आल्या आहेत. १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे.
या दिवशी रुग्णसंख्या २०० च्या वर
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. ४ डिसेंबरला २२८, ५ डिसेंबरला २१९, ८ डिसेंबरला २५०, ९ डिसेंबरला २१८, ११ डिसेंबरला २५६, १४ डिसेंबरला २२५, १५ डिसेंबरला २३८, १६ डिसेंबरला २७९, १७ डिसेंबरला २९५, १८ डिसेंबरला २८३, १९ डिसेंबरला ३३६, २० डिसेंबरला २०४, २१ डिसेंबरला ३२७, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
सहा वेळा शून्य मृत्यूची नोंद
मुंबईमध्ये दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा तर 22 डिसेंबरला सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.