ETV Bharat / city

Doctor Strike Back: निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे! शासनाकडून काही मागण्या मान्य - निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला

मार्ड या निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनकडून (दि. 1 ऑगस्ट)रोजी संपाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, तो आता स्थगित करण्यात आला आहे. ( Doctor Strike Back ) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने बंधपत्रित पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या नियुक्ती तातडीने कराव्या, त्याचबरोबर या डॉक्टरांच्या नियुक्तीच्या संदर्भातली यादीही शासनाने त्वरित जाहीर करावी अशी मागणी यांची आहे.

निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे
निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे
author img

By

Published : Aug 1, 2022, 4:35 PM IST

मुंबई - मुंबईतील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनकडून (दि. 1 ऑगस्ट)रोजी संपाचा इशारा देण्यात आला होता. परंतु, तो आता स्थगित करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने बंधपत्रित पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या नियुक्ती तातडीने कराव्या, त्याचबरोबर या डॉक्टरांच्या नियुक्तीच्या संदर्भातली यादीही शासनाने त्वरित जाहीर करावी अशी मागणी यांची आहे. ( Resident doctors' strike finally back ) याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या पातळीवर त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखील नियुक्त्या कराव्यात या मागण्यांसाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात माड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला संपाचा इशारा दिला होता. शासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यामुळे अखेर हा संप त्यांनी स्थगित केला आहे, अशी माहिती मार्डने ईटीव्ही भारतला दिली आहे.

बंधपत्रित उमेदवार डॉक्टर म्हणजे काय? - वैद्यकीय शिक्षण घेताना दरवर्षी जे (MD) डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि (MS)मास्टर ऑफ सर्जनच्या तिसऱ्या वर्षाला जे उमेदवार असतात. त्यांना तृतीय वर्ष उत्तीर्ण झाल्यावर शासनाने ठरवलेल्या नियमानुसार एक वर्ष सार्वजनिक रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशा डॉक्टर उमेदवारांना बंधपत्रित डॉक्टर उमेदवार म्हणतात.

1468 बंधपत्रित निवासी डॉक्टर नियुक्त्या होणार - राज्यात वैद्यकीय शिक्षण संचलनालयाने आणि संशोधन विभाग यांच्या वतीने केंद्रीय पद्धतीने बंधपत्रित उमेदवारांची नियुक्ती केली जाते, ही नियुक्ती दरवर्षी केली गेली पाहिजे. अन्यथा, रिक्त जागा तशाच राहतात.
त्यामुळे मुंबईमधील सरकारी रुग्णालयांवर प्रचंड ताण येतो. मार्ड सांघटनेच्या अध्यक्षांच्या दाव्यानुसार, ज्यांना वैद्यकीय शिक्षण संचलनालय आणि संशोधन यांनी बंधपत्रित डॉक्टर उमेदवारांना नियुक्ती न दिल्याने सुमारे 2100 इतक्या उमेदवारांना घरीच बसून राहावे लागत आहे. हे डॉक्टर सेवेसाठी सज्ज आहेत. ते महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती कधी येईल याची वाट पाहत आहेत. मात्र, त्यांना घरी बसून राहावे लागत आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि संशोधन विभाग आहे असा इशारा मार्डने दिला होता.

आंदोलन करण्याचा प्रश्नच उदभवणार नाही - निवासी डॉक्टरांनी मागण्या वैद्यकीय शिक्षण संचालनालय व संशोधन विभागाने मान्य झाल्यामुळे संप स्थगित केला. मात्र, शासनाने म्हटल्यानुसार नियुक्त्या त्वरित कराव्यात म्हणजे आंदोलन करण्याचा प्रश्नच उदभवणार नाही, असही मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे यांनी ईटीव्ही भारतकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : 'संजय राऊत खरे पुष्पा, झुकेगा नहीं...'; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.