मुंबई - काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारुला विदेशी दारुचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी (दि. 20 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. उत्पादकांच्या याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. राज्यात मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये इलाइट आणि सुपर प्रिमियम, असे दोन गट त्या केले आहेत. काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारूमुळे उत्पन्न वाढत नव्हते. उत्पादकांच्या शासनाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. राज्य शासनाने ही बाब विचारात घेत, संबंधित देशी दारुला विदेशी दारुचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे छोट्या दुकानांना विस्तार करता येईल. मद्य विक्रीची कक्षा ही वाढवता येईल. महसूल वाढवण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि हरियाणामध्ये यापूर्वी घेतला होता.
हेही वाचा - सहा महिन्यानंतर प्रथमच एसटी सेवा पूर्वपदावर - अनिल परब