ETV Bharat / city

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी - List of MLAs appointed by the Governor

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने गेल्यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी या १२ नावांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. आठ महिने उलटून गेले तरी राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतला नाही. न्यायालयात याबाबत रतन सोली यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्याबाबतची येत्या शुक्रवारी (ता. १६ जुलै)रोजी सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Jul 12, 2021, 7:08 PM IST

मुंबई - विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा तिढा आठ महिन्यांपासून कायम आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या शुक्रवारी (ता. १६ जुलै)रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी १६ जूनला यासंदर्भात सुनावणी झाली होती.

१२ सदस्यांचा तिढा

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने गेल्यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी या १२ नावांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. आठ महिने उलटून गेले तरी राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतला नाही. न्यायालयात याबाबत रतन सोली यांनी जनहित याचिका दाखल केली होती. राज्यपाल कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत नसले, तरी त्यांचे निर्णय कायद्याच्या कक्षेत असणे आवश्यक आहे, असा दावा यावेळी याचिकाकर्त्यांनी केला होता. जनहित याचिकेद्वारे राज्यपालांच्या निर्णयावर सवाल उठवता येतो का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात यावर आज सुनावणी झाली.

'सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी निर्णय घ्यावा'

राज्यपालांना कोणत्याही प्रकारे कायद्याच्या चौकटीत आणता येत नाही. मात्र, त्यांच्या निर्णयाबाबत संविधानानुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राज्यपालांनी संबंधित विषयावर भूमिका स्पष्ट करावी, इतकीच याचिकेतून मागणी करतोय. राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यावा, त्यानुसार मग सरकार पुढची कार्यवाही करू शकेल, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. तसेच, सरकारने पाठवलेली नावे कायद्याने मान्य करणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, तरीही निर्णय घेतला जात नाही. हा प्रकार कायद्याने संमत केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला. तर, विधीमंडळाच्या मंजुरीशिवाय राज्यपाल कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. परंतु, सरकारने दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी निर्णय घेणे आवश्यक असते, अशी भूमिका महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारच्यावतीने न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर मांडली. दरम्यान, येत्या शुक्रवारी यासंदर्भात पुढील सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कोण आहेत 12 सदस्य

काँग्रेस- १) सचिन सावंत, २) रजनी पाटील, ३) मुजफ्फर हुसैन, ४) अनिरुद्ध वणगे (कला). राष्ट्रवादी काँग्रेस - १) एकनाथ खडसे, २) राजू शेट्टी, ३) यशपाल भिंगे (साहित्य), ४) आनंद शिंदे (कला). शिवसेना - १) उर्मिला मातोंडकर, २) नितीन बानगुडे पाटील ३) विजय करंजकर ४) चंद्रकांत रघुवंशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.