मुंबई - मोठ्या भावाने चाकूने भोकसून लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काळचौकी परिसरात रविवा (दि. 27 फेब्रुवारी)रोजी मध्यरात्री घडली आहे. मोठ्या भावाच्या मित्राला लहान भावाने केलेल्या दमदाटीचा राग अनावर झाल्याने ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. (older brother murdered the younger brother) लालबागच्या चिवडा गल्ली परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये आकाश भरूगडे याचा मृत्यू झाला आहे.
सदर घटनेची माहिती घेत पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. हे दोघ भाऊ काळाचौकच्या जीडी आंबेकर मार्ग, आंबेवाडी येथील राहणारे आहेत. अशोक भरूगडे (वय 30) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - Son of Satya Nadella Died : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा मुलगा झैन याचे निधन