ETV Bharat / city

कोविड हॉस्पिटलचा हलगर्जीपणा, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यवर प्रश्नचिन्ह - मुंबई कोरोना अपडेट

मुंबई उपनगरात कोविड सेंटर मधील जैव वैद्यकीय कचरा बेकायदेशीर, हॉस्पिटलचा हलगरजीपणा बघायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यवर परीणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे.

शुभम रुग्णालय
शुभम रुग्णालय
author img

By

Published : Apr 26, 2021, 3:25 PM IST

मुंबई - मानखुर्द मधील मोहिते पाटील नगरात, सी वॉर्ड बाहेर कचराकुंडी आहे. त्या कचराकुंडीमध्ये हॉस्पिटल मधील जैव वैद्यकीय कचरा नेहमीच टाकण्यात येतो. बुधवारी रात्री ११ वाजता हॉस्पिटलमधील कर्मचारी हा कचरा टाकण्यासाठी आले होते. नगरातील स्थनिक लोकांनी या दोन महिलांना अडवले आणि विचारपूस केली असता, आम्ही शुभम हॉस्पिटलमधील कर्मचारी आहोत. असे त्यांच्या कडून सांगण्यात आले.

कचरा टाकतांना रुग्णालयातील कर्मचारी

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बेकायदेशीररित्या हा कचरा येथे टाकण्यात येतो. शुभम हॉस्पिटल हे खाजगी असून, कोविड सेंटर म्हणून काम करत आहे. हे कोविड सेंटर असून सुद्धा हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा स्थानिक लोकांच्या कचराकुंडी मध्ये बेकायदेशीर रित्या टाकला जात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरातील लोक येथे कचरा टाकण्यासाठी येत असतात. यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकांची माफी मागितली

'आमच्या हॉस्पिटलमधील हा कचरा आहे. आमचे कर्मचारी यांच्याकडून चुकून ही गोष्ट घडली आहे', असे शुभम हॉस्पिटलमधील डॉ. रवींद्र यांनी सांगीतले आहे. तसेच त्यांनी नागरिकांची माफी देखील मागितली आहे. पुन्हा असा कोणताही प्रकार आमच्याकडून घडणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यासर्व प्रकरणाकडे महानगरपालिका पूर्व विभागाचे आरोग्य अधिकारी पाठफिरवत आहे, असे दिसत आहे.

हेही वाचा - पश्चिम बंगाल विधानसभा रणसंग्राम : आज सातव्या टप्प्यात 34 जागांसाठी मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.