ETV Bharat / city

ड्रग्ज प्रकरणी एसआयटी आता केवळ तीनच प्रकरणांची करणार चौकशी; तर तीन प्रकरण वगळली

एनसीबी एसआयटी आता आर्यन खान, समीर खान, अरमान कोहली या तीन प्रकरणांचीच चौकशी करेल. सुरुवातीला सहा प्रकरणे एसआयटीकडे हस्तांतरित करण्यात आली होती, परंतु उर्वरित तीन प्रकरणांमध्ये कोणतेही विदेशी दुवे अस्तित्वात नसल्याची माहिती मिळाली आणि एनसीबीच्या चौकशीतून वगळण्यात आले. वगळण्यात आलेल्या तीन प्रकरणांमध्ये आरोपींमध्ये ओळखीची व्यक्ती नव्हती.

NCB
NCB
author img

By

Published : Nov 16, 2021, 10:52 AM IST

Updated : Nov 16, 2021, 1:53 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची SIT आता फक्त तीन प्रकरणांची चौकशी करणार आहे. एसआयटीने इतर तीन प्रकरणे फेटाळून लावली आहेत. नवाब मलिकांचे जावई समीर खान, आर्यन खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांची चौकशी करणार आहे. आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह (Aryan Khan Cruise Drugs Case) सहा प्रकरणांचा तपास एनसीबीच्या विशेष पथकाकडे (Special Squad of NCB) एसआयटी सोपवण्यात आला होता. परंतु त्यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास एसआयटीकडून केला जाणार आहे. अन्य तीन प्रकरणांमध्ये कोणतेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आढळलेले नाही, असे एसआयटी मधील सूत्रांनी सांगितले आहे.

तीन प्रकरणे वगळली -

मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने (Bureau of Narcotics Control) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. याशिवाय अनेकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. या कारवाईनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडेंवर अनेक हल्ले केले होते, त्यानंतर वानखेडे यांना ड्रग्ज प्रकरणातील खटल्यातून हटवण्यात आले होते. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने एसआयटी आता तीन प्रकरणे वगळली आहेत.

एसआयटी करणार तपास -

एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह (Sanjay singh) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील अधिकाऱ्याचे विशेष चौकशी पथक या प्रकरणांचा नव्याने तपास करत आहे. ती सहा प्रकरणे मुंबई एनसीबीकडूनच वर्ग करण्यात आली होती. परंतु त्यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास एसआयटी करणार आहे. त्यात आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणाचा समावेश आहे. मुंब्रा येथील एमडी ड्रग्ज प्रकरण, जोगेश्वरी येथील चरस प्रकरण आणि डोंगरी येथील एमडी ड्रग्ज (MD Drugs) प्रकरण अशी अन्य तीन प्रकरणे एसआयटीने सोडली असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय सबंध नाही -

एनसीबी एसआयटी आता आर्यन खान, समीर खान, अरमान कोहली या तीन प्रकरणांचीच चौकशी करेल. सुरुवातीला सहा प्रकरणे एसआयटीकडे हस्तांतरित करण्यात आली होती, परंतु उर्वरित तीन प्रकरणांमध्ये कोणतेही विदेशी दुवे अस्तित्वात नसल्याची माहिती मिळाली आणि एनसीबीच्या चौकशीतून वगळण्यात आले. वगळण्यात आलेल्या तीन प्रकरणांमध्ये आरोपींमध्ये ओळखीची व्यक्ती नव्हती. मुंबईत मुंब्रा, जोगेश्वरी आणि नागपाडा येथे किरकोळ अमली पदार्थ जप्त करण्यासंबंधीचे तीनही गुन्हे दाखल झाले आहेत.

Last Updated : Nov 16, 2021, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.