ETV Bharat / city

ठाकरे गटाला पालिकेची ताकीद! अटी शर्थीचे उल्लंघन केल्यास २० हजार दंड

दादर शिवाजी पार्कवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळावा करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, अटी शर्थीचे उल्लंघन केल्यास अनामत रक्कम म्हणून भरलेले २० हजार रुपये दंड म्हणून आकारले जातील. तसेच, पुढील वर्षी मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही असे पालिकेने उद्धव ठाकरे गटाला कळवले आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 4, 2022, 10:45 PM IST

मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा गेले ५६ वर्षे दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होत आहे. बाळासाहेब ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे या मैदानावर शिवसैनिकांना मेळाव्याच्या दिवशी संबोधित करत आले आहेत. कोरोना दरम्यान गेले दोन वर्षे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यंदा मात्र एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदार फोडून बंडखोरी केल्याने दसरा मेळावाबाबत वाद निर्माण झाला होता.

ठाकरे गटाला परवानगी - दसरा मेळावा साजरा करता यावा यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पालिकेला पत्र दिले होते. यावर पालिकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता. यामुळे ठाकरे गट उच्च न्यायालयात गेला. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी पालिकेने परवानगी नाकारली. उच्च न्यायालयाने मात्र ठाकरे गटाला अटी व शर्ती नुसार दसरा मेळावा साजरा करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अधिक मनुष्यबळ लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तर परवानगी मिळणार नाही - उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगी नंतर पालिकेच्या जी उत्तर विभागाने ठाकरे गटाकडून अटी व शर्थीचे पालन करू असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. मैदानाची अनामत रक्कम म्हणून पालिकेने ठाकरे गटाकडून २० हजार रुपये घेतले आहेत. रात्री १० वाजेपर्यंत दसरा मेळावासाठी परवानगी, कार्यक्रम झाल्यावर मैदान होते तसे करून द्यावे, अशा अटी शर्ती पालिकेने ठाकरे गटाला घातल्या आहेत. मैदानाचे नुकसान, गैरवापर, अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास २० हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. तसेच, पुढील वर्षी परवानगी दिली जाणार नाही असे पालिकेने ठाकरे गटाला कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.