ETV Bharat / city

Abuse Minor Girl : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला अटक - मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग ( Abuse of a minor girl ) करणाऱ्या नराधमाला अखेर मुंबई रेल्वे क्राईम ब्रांचने ( Mumbai Railway Crime Branch ) चर्चगेट परिसरामध्ये अटक केली आहे. 10 जुलै रोजी पीडित मुलीवर लोअर परेल स्टेशनवर ( Lower Parel Station ) अतिप्रसंग करण्यात आला होता.

Murderer aAbuse Minor Girl rrested
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
author img

By

Published : Jul 25, 2022, 10:21 PM IST

मुंबई- 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ( Abuse of a minor girl ) लोअर परेल रेल्वे स्टेशन ( Lower Parel Station ) परिसरात ब्लेडने वार करून अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला अखेर मुंबई रेल्वे क्राईम ब्रांचने ( Mumbai Railway Crime Branch ) चर्चगेट परिसरामध्ये अटक केली आहे. 10 जुलै रोजी पीडित मुलीवर लोअर परेल स्टेशनवर अतिप्रसंग करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला आज मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरीश कुमार गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी चोरी मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने अशी किती कृत्य अजून केली आहेत याबाबत पोलीस तपास करत आहेत. पीडित मुलीवर 10 जुलै रोजी बलात्कार झाला होता. मुलीने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी कसून शोध घेत 15 दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचा - Mokka action on gangster : पुण्यात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळी विरोधात मोक्का कारवाई

आरोपीला 15 दिवसात अटक - घरामध्ये काही कारणावरुन वाद झाल्याने पीडित मुलगी घर सोडून लोअर परळ स्टेशन परिसरात आली होती. यावेळी मुलीला एकटी बघून या नराधमाने आधी तिच्याशी ओळख केली. नंतर स्टेशन परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करत ब्लेडने वार केले होते. नराधमाच्या तावडीतून सुटका करत मुलगी घरी परतली होती. तीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.

चर्चगेट परिसरातून आरोपीला अटक - पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, घटना रेल्वे हद्दीत घडल्याने गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई रेल्वे गुन्हे शाखेने विविध टीम बनवून आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान, आरोपी हरिश कुमार गुप्ता चर्चगेट परिसरात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चर्चगेट परिसरातून आरोपीला अटक केली. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा - Fake Money : बनावटनोटाप्रकरणी तीघांना बेड्या; साहित्यासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.