मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे असलेल्या मैदानावर सहभाग घेणार आहेत. 14 मे ला होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीची पाहणी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडून करण्यात आली. 14 तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदान ही कमी पडेल असा टोला अनिल परब यांनी विरोधकांना लगावला आहे. पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा टोला लगावला. तसेच निवडणुका कधीही होऊ द्या शिवसेना निवडणुकांसाठी नेहमीच तयार असते असा इशाराही विरोधकांना त्यांनी यावेळी दिला.
विरोधकांना चोख उत्तर मिळणार - आपण विरोधकांना 14 तारखेच्या सभेत उत्तर देणार असल्याचा इशारा आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून मुख्यमंत्री आणि शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं आहे. तर तिथेच एक मे ला भारतीय जनता पक्षाकडून मुंबईत सभा घेण्यात आली होती. या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. अयोध्येच्या मुद्द्याला हात घालत शिवसैनिकांवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका फडणवीसांनी या सभेच्या माध्यमातून केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री या सभेतून कोणाकोणावर निशाणा साधणार याकडे शिवसेनेसह सर्वच पक्षाचे लक्ष लागला आहे.
14 मे च्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदान कमी पडेल - अनिल परब - Uddhav Thackeray rally 14 May 2022
14 मे ला होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीची पाहणी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडून करण्यात आली. 14 तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदान ही कमी पडेल असा टोला अनिल परब यांनी विरोधकांना लगावला आहे.