मुंबई - पहिल्या पत्नीशी कायदेशीररित्या घटस्फोट होत नाही. तोपर्यंत दुसरी पत्नी मृत पतीच्या पेन्शनसाठी पात्र नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सोलापूर येथील याचिकाकर्त्या महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून ( HC Result on husbands pension ) लावली. यावेळी त्यांनी हा निर्णय ( Mumbai HC Result ) दिला.
काय आहे प्रकरण -
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या महादेव ताटे यांनी दोन विवाह केले होतो. त्यातच 1996 साली ताटे यांचा मृत्यू झाला. त्यांनी दोन विवाह केले असल्याने कायद्यानुसार त्यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीला पेन्शनचा लाभ मिळत होता. पेन्शन योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महादेव यांची दुसरी पत्नी शामल ताटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. त्यावर न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
महादेव यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला असून पतीच्या पश्चात पेन्शनचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून आपण राज्य सरकारकडे 2007 ते 2014 दरम्यान चारवेळा पत्र व्यवहार केला असून सरकारकडून त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. असा दावा याचिकाकर्त्यां शामल यांच्याकडून खंडपीठासमोर करण्यात आला. आपल्याला तीन अपत्ये असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला पेन्शन देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी खंडपीठाकडे केली. हिंदू विवाह कायद्यानुसार पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होत नाही तोपर्यंत दुसऱ्या पत्नीला पतीच्या पेन्शनचा अधिकार देता येत नाही. तसेच याचिकाकर्त्यांनी महादेवच्या पहिल्या पत्नीसोबत केलेल्या करारानुसार, त्यांनी मासिक पेन्शनवरील आपले अधिकार सोडले असल्याचे राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला सांगण्यात आले.
न्यायालयाने याचिका फेटाळली -
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर याचिकाकर्ते शुद्ध हेतूने न्यायालयाची पायरी चढलेले दिसत नाहीत. कारण, त्यांनी पहिल्या पत्नीसोबत पेन्शनसंदर्भात करार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच मृत व्यक्तीची पहिली पत्नी ह्यात असताना याचिकाकर्त्या महिलेशी झालेला दुसरा विवाह कायद्यानुसार रद्द बातल ठरतो, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावली.
हेही वाचा - Big Incident in UP : यूपीत मोठी दुर्घटना; हळदीच्या कार्यक्रमात विहिरीत पडून 11 महिलांचा मृत्यू, अनेक गंभीर