ETV Bharat / city

कांजूरमधील कोल्डस्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने परेलला उतरणार पहिली लस - covid vaccine news

मुंबई महापालिकेकडून कांजूर येथे उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने परेल येथील पालिकेच्या एफ साऊथ कार्यलयात ठेवली जाणार आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jan 12, 2021, 7:38 PM IST

मुंबई - कोरोनावर केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची लस उद्या मुंबईत येत आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून कांजूर येथे उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने परेल येथील पालिकेच्या एफ साऊथ कार्यलयात ठेवली जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

लसीकरणाची तयारी

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाविरोधात मुंबईकर लढा देत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकराने केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोनावरील भारत आणि सिरम या दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. लस लवकरच उपलब्ध होणार म्हणून देशात आणि महाराष्ट्रात कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहेत. मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला आहे. त्यानंतर लस कधी येणार याची प्रतीक्षा असताना आज देशभरातील दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भूवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनऊ, चंदीगड आदी १३ ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.

कांजूर येथील कोल्ड स्टोरेजचे काम अपूर्ण

मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे १० लाख लसी साठवता येऊ शकतात, अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार असल्याचे गोमारे यांनी सांगितले.

एफ साऊथ येथे काम पूर्ण

मुंबईमधून सवा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंट लाइन वर्कर अशा २ लाख लोकांची नावे कोविन अ‌ॅपवर नोंदविण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

५ हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग

मुंबई महानगरपालिकेने २७५ मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून २५०० कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. ५ कर्मचाऱ्यांची एक टीम या प्रमाणे ५०० टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी ५ हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे काकाणी यांनी सांगितले.

सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण

मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस

पालिकेच्या केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी ९ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी ७२ बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक ५ बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान १०० जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

पंतप्रधान साधणार संवाद

येत्या १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालिकेच्या कूपर रुग्णालयातील लाभार्थी आणि लास देणारे डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोविन अ‌ॅपमध्ये आलेल्या अडचणी यावेळी पंतप्रधान जाणून घेणार आहेत. यासाठी पालिका प्रशासनाला टू वे व्हिडिओ कॉन्फरन्सिगची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.