ETV Bharat / city

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे अटके प्रकरणी पोलीस महासंचालकांना हजर राहण्याचे समन्स - शरद पवार

अभिनेत्री केतकी चितळे अटके प्रकरणी ( Actress Ketki Chitale Arrested Case ) राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women ) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रजनीश सठे ( Director General of Police Rajneesh Sathe ) यांना समन्स पाठवले आहे. त्यांना 17 जून रोजी दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Director General of Police Rajneesh Sathe
पोलीस महासंचालक रजनीश सठे
author img

By

Published : Jun 16, 2022, 5:56 PM IST

मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे अटके प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रजनीश सठे यांना समन्स पाठवले आहे. त्यांना 17 जून रोजी दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अभिनेत्री चितळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नव्हते. या प्रकरणात मानहानीची तरतुदी केल्याबद्दल 7 दिवसांच्या आत राष्ट्रीय महिला आयोगाने स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच महिला आयोगाच्या पुढे 17 जून रोजी सुनावणी दरम्यान हजर राहण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. अभिनेत्री केतकी चितळेने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेत, कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. 15 मे रोजी केतकी यांना अटक करण्यात आली होती.

केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल? - अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलिस ठाण्यात चितळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 500, 505(2), 501, 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती, तसेच पिंपरी चिंडवड येथे केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी पोस्ट डिलीट करणार नाही केतकीचा युक्तीवाद - केतकीने कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं होते की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने उपस्थित केला. केतकीने सुनावणीदरम्यान स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे असा युक्तीवाद तीने कोर्टासमोर केला.

हेही वाचा - 10th Exam Result : दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार, 'येथे' पाहा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.