ETV Bharat / city

संविधानिक पदाची गरिमा राखली गेली पाहिजे, नाना पटोलेंचा राज्यपालांना चिमटा - नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगलीत आपल्या भाषणा दरम्यान राज्यपालपदावर असलेले भगतसिंह कोश्यारी हे विक्षिप्त आहेत, अशी घणाघाती टीका केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. यावरच आपली भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची गरिमा राखली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

Nana Patole on governor
Nana Patole on governor
author img

By

Published : Feb 5, 2021, 2:57 PM IST

Updated : Feb 5, 2021, 3:14 PM IST

मुंबई - संविधानाने तयार केलेली जी काही संविधानिक पदे आहेत, त्या पदांचा सन्मान हा झालाच पाहिजे. पण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने देखील त्या पदाची गरिमा राखलीच पाहिजे असा चिमटा विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी काढला आहे. काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगलीत आपल्या भाषणा दरम्यान राज्यपालपदावर असलेले भगतसिंह कोश्यारी हे विक्षिप्त आहेत, अशी घणाघाती टीका केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. यावरच आपली भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची गरिमा राखली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका
मविआ आणि राज्यपाल यांच्यात वारंवार संघर्ष -
महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झाल्यापासूनच राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्यात काही आलबेल नसल्याचं चित्रं आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधीपासून ते राज्यपालांच्या नुकत्याच झालेल्या नाशिक दौऱ्यापर्यंत दोन्ही बाजूचे संबंध ठीक नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेले मंदिर उघडण्यास राज्य सरकार उशीर करतंय, अशा आशयाचे पत्र थेट राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यावर देखील सरकारने आपली नाराजी व्यक्त केली होती. तर राज्यपाल नियुक्त आमदारांचे पत्र राज्य सरकारने राज्यपालांना देऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यपाल त्या पत्रावर स्वाक्षरी करत नसल्याने महाविकास आघाडी सरकार राज्यपालांवर नाराज आहे. तसेच राज्य सरकार जो काही निर्णय घेते, राज्यपाल नेहमीच टीका करताना दिसतात. त्यामुळे राज्यपाल संविधानिक पदावर बसून भाजपचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या सरकारने वेळोवेळी केला आहे.
भारतीय जनता पक्षाला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही -
लोकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ बिलाच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. मात्र भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. राज्यात भाजप सरकार असताना देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली एकही घोषणा पूर्ण केली नसून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्या तेलांच्या किंमती घसरल्या असतानाही इंधनाचे दर गगनाला भिडत आल्याचा टोलाही त्यांनी भाजपप्रणित केंद्र सरकारला लगावला.

Last Updated : Feb 5, 2021, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.