ETV Bharat / city

महाराष्ट्राची संस्कृती एमटीडीसी-नाशिक बोट क्लबच्या लोगोवर, पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते अनावरण - महाराष्ट्राची संस्कृती आणि पर्यंटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि नाशिक बोट क्लब या दोन्ही संस्थाच्या लोगोचे अनावरण आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी हे लोगो महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे असल्याचे मत व्यक्त केले.

Tourism minister aditya thackeray
महाराष्ट्राची संस्कृती एमटीडीसी-नाशिक बोट क्लबच्या लोगोवर,
author img

By

Published : Nov 11, 2020, 9:11 PM IST

मुंबई - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. तसेच नाशिक येथील बोट क्लबच्या लोगोसह एमटीडीसीच्या नवीन फिडबॅक क्यूआर कोडचे अनावरण आज राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यातील पर्यटनास चालना देण्याच्या अनुषंगाने एअर बीएनबीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, इंडीयन स्कूल ऑफ डिजाईन अँड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, एमटीडीसीचे सरव्यवस्थापक दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. एअर बीएनबीचे व्यवस्थापक अमनप्रित बजाज हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

एमटीडीसी-नाशिक बोट क्लबच्या लोगोवर
एमटीडीसी-नाशिक बोट क्लबच्या लोगोवर
लोगोमधून महाराष्ट्राची संस्कृती -

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, चंद्रकोर बिंदू, वारली कला, संतभूमी अशा विविध घटकांना अर्थपूर्ण रितीने मांडणाऱ्या एमटीडीसीच्या नवीन लोगोमधून महाराष्ट्राची संस्कृती दिसते. कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यापार्श्वभूमीवर एमटीडीसीचे राज्यातील रिसॉर्टस् आणि विविध उपक्रमांची भूमिका महत्वाची आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला येत्या काळात चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

पर्यटन, आदरातिथ्य व्यावसायाला चालना -

पर्यटन राज्यमंत्री कुमार अदिती तटकरे म्हणाल्या की, सध्याच्या काळात पर्यटन विभाग व एमटीडीसी एकत्रितपणे नवनवीन उपक्रम राबवून राज्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायाला चालना देत आहे. एमटीडीसीचा नवीन लोगो हा राज्याची संस्कृती, शौर्य, निसर्ग संपन्नता दाखवणारा आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाची नवीन ओळख पर्यटकांना यातून होईल. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमातून राज्यात येणाऱ्या पर्यटकांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. इंडीयन स्कूल ऑफ डिजाईन अँड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी आणि त्यांच्या टीमने लोगो बनवले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.