ETV Bharat / city

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही..! राज्य सरकारकडून परमबीर यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू - कायद्या पेक्षा मोठे नाही

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या विरोधात पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खंडणीचा गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी राज्य सरकार आणि परमबीर यांची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी राज्य सरकारने कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगत परमबीर यांच्या चौकशीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे स्पष्ट केले.

परमबीर यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू

author img

By

Published : Jul 28, 2021, 1:30 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होत असतानाच, आता त्यांचे पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून परमबीर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. भारतीय सेवा नियम आणि कायदा या अंतर्गत ही चौकशी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचेही राज्य सरकारने न्यायालयात म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या विरोधात पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खंडणीचा गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी राज्य सरकार आणि परमबीर यांची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी राज्य सरकारने कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगत परमबीर यांच्या चौकशीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे स्पष्ट केले. एकापाठोपाठ एक तक्रारी दाखल होत असताना परमबीर सिंह यांनी स्वत:ला कायद्यापेक्षा मोठ समजू नये, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगितल्याचा आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंह यांची सचिन वाझे प्रकरणातही चौकशी सुरू आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून संजय पांडे या अधिकाऱ्या नेतृत्वात परमबीर यांची चौकशी सुरू करण्यात येणार होती. मात्र, त्यांनी परमबीर यांची चौकशी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर नव्या अधिका-यांची नियुक्त करून परमबीर यांच्याविरोधात नव्यानं चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीला वारंवार नोटीस बजावूनही परमबीर सिंह एकदाही हजर झालेले नाहीत. भारतीय सेवा नियम आणि कायदा अंतर्गतही राज्य सरकारनं परमबीर यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात यापूर्वीचे दाखल गुन्हे-

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा हप्ता वसुली करायला लावल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्यांच्याच विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अकोल्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

परमबीर यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप-

अँटिलिया येथील स्फोटक प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली होती. यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप लावले होते. याप्रकरणी सीबीआयने चौकशी दरम्यान अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले. सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

परमबीरांच्या सहकाऱ्याने केले होते भाकित-

परमीबर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या ठाण्यातील उद्योजकांने पोलीस चौकशीत एक मोठा गौप्य स्फोट केला आहे. मार्चमध्ये परमबीर यांचा खास आणि अग्रवाल याचा पूर्वीचा भागिदार पुनमिया यांच्यासोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत एक पोलीस अधिकारी म्हणत होता की, एनआयए लवकरच महाराष्ट्रातील 4 ते 5 मंत्र्यांची चौकशी करेल आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊन कोसळेल, अशी चर्चा ऐकली असल्याचे स्पष्टीकरण अग्रवाल यांनी आपल्या जबाबात दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.