ETV Bharat / city

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची १ ली गुणवत्ता यादी आज होणार जाहीर, 'या' तारखेपर्यंत प्रवेश घेता येईल - अकरावी प्रवेश गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता ( Merit List for Class 11 Online Admission ) यादी आज माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण महाराष्ट्र कार्यालयाच्या ( Class 11 Admission maharashtra ) नियोजनानुसार जाहीर होणार आहे. सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Merit List for Class 11 Online Admission
अकरावी प्रवेश गुणवत्ता यादी
author img

By

Published : Aug 3, 2022, 8:00 AM IST

मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता ( Merit List for Class 11 Online Admission ) यादी आज माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण महाराष्ट्र कार्यालयाच्या ( Class 11 Admission maharashtra ) नियोजनानुसार जाहीर होणार आहे. सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांची चिंता काही प्रमाणात दूर झाली असे म्हणता येईल.

हेही वाचा - Reservation In Employment for Transgenders: ट्रान्सजेंडरला नोकरीत आरक्षणाची तरतूद नाही; महाट्रान्सकोकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर (पुणे) यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, 25 जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरवात झाली, तर 3 ऑगस्ट म्हणजेच आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ ही प्रक्रिया रखडलेली होती. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात 6 ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचे आहे.

आज म्हणजे 3 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यामध्ये पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जाईल. सकाळी 10 ते 6 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेशाची औपचारिकता या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा. जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी प्रोसीड फॉर अॅडमिशनवर क्लिक करावे. आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी आणि महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.

प्रवेश घेणे अनिवार्य असेल - जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तो विद्यार्थी पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र, पसंती क्रमांक एक नंबरला असलेले कॉलेज विद्यार्थ्याला पहिल्या फेरीत मिळाले असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल. अन्यथा त्याला एक प्रवेश फेरी प्रतिबंधित केली जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करून त्यानंतर रद्द करायचा असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल. 7 ऑगस्ट 2022 रोजी अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील व त्यानंतर दुसरी फेरी आयोजित केली जाईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक (पुणे) महेश पालकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

११ वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल -

७ ते १७ ऑगस्ट - नियमित दुसरी फेरी

१८ ते २५ ऑगस्ट - नियमित तिसरी प्रवेश फेरी

२६ ऑगस्ट ते ३सप्टेंबर - नियमित प्रवेशाची विशेष फेरी

हेही वाचा - Gold Silver Rates : सोने-चांदीचे दर आज स्थिर, पहा किती आहे सोन्याचा दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.