ETV Bharat / city

Sameer Wankhede : समीर वानखेडे हाजीर हो.. कोपरी पोलिसांनी बजावले समन्स - समीर वानखेडेंना कोपरी पोलिसांचे समन्स

खोटी माहिती देऊन बारचा परवाना घेतल्याप्रकरणी एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी हजर होण्याबाबत त्यांना कोपरी पोलिसांनी समन्स बजावले आहे.

समीर वानखेडे
समीर वानखेडे
author img

By

Published : Feb 22, 2022, 11:00 PM IST

मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना कोपरी पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. समीर वानखेडे हे उद्या हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • Thane's Kopri Police Station summons former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede to appear at 11 am (tomorrow) in connection with an alleged forgery case on a complaint by the state excise department

    Bombay HC has granted him interim protection till February 28. pic.twitter.com/0RhxbwcgeD

    — ANI (@ANI) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण?

समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढले होते. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने हे परमीट घेण्यात आले. त्यावेळी समीर यांचं वय 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस होते. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे सद्गुरू बार आहे. या बारचं परमीट नूतनीकरणही करण्यात आले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारचं परमीट नूतनीकरण करण्यात आलं आहे. हा बार आणि रेस्टॉरंट आहे असंही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

२८ फेब्रुवारीपर्यंत अटक नाही

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करणार न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai high court order to Thane Police ) ठाणे पोलिसांना निर्देश दिले आहेत.

तातडीची सुनावणी नाही -

समीर वानखेडे यांच्या ठाण्यातील एफआयआर रद्द करणारी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने यापूर्वी ताशेरे ओढले आहेत. समीर वानखेडेंनी काल सादर केलेली याचिका आज बोर्डावर कशी आली? असा प्रश्न न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांनी कोर्ट स्टाफ आणि वानखेडेंच्या वकिलांना केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.