ETV Bharat / city

तेजस ठाकरेंनी शोधला नवा अंध मासा - रक्तामिथिस मुंबा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी मुंबई ब्लाइंड ईल म्हणजेच सर्पाच्या प्रकारातील एका अंध माश्याचा शोध लावला आहे. या प्रजातीचे ‘रक्तामिथिस मुंबा’ असे नामकरण करण्यात आले आहे. तेजस ठाकरे, प्रवीणराज जयसिम्हान आणि अनिल मोहोपात्रा यांच्या टीमने हे संशोधन केले आहे.

तेजस ठाकरेंनी शोधला नवा अंध मासा
तेजस ठाकरेंनी शोधला नवा अंध मासा
author img

By

Published : Oct 1, 2021, 2:10 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी मुंबई ब्लाइंड ईल म्हणजेच सर्पाच्या प्रकारातील एका अंध माश्याचा शोध लावला आहे. या प्रजातीचे ‘रक्तामिथिस मुंबा’ असे नामकरण करण्यात आले आहे. तेजस ठाकरे, प्रवीणराज जयसिम्हान आणि अनिल मोहोपात्रा यांच्या टीमने हे संशोधन केले आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पर आणि शेपूट नसलेल्या एका नव्या दुर्मिळ माश्याची प्रजाती शोधून काढली आहे.

पाण्यातील पहिलाच मासा
२०१९ साली जोगेश्वरीतील एका अंध शाळेच्या विहिरीत मासा सापडला होता. त्याच्यावर साधारण दोन वर्षे संशोधन सुरू होते. विहिरीत पाणी पाझरण्याच्या जागी असलेल्या लाल मातीत हा मासा सापडतो. त्याला डोळे नसल्याने केवळ वासावरून तो भोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेतो व छोटे किडे खातो. अशाप्रकारे अंध असणारा हा महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील पहिलाच मासा आहे. मुंबाची त्वचा पारदर्शक असून त्याच्या शरीरातील लाल रक्तवाहिन्यांमुळे तो लालसर रंगाचा दिसतो.

महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम घाटातील ही पहिली पूर्णपणे अंध तसेच भूगर्भातील गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे. ‘मुंबा’ या प्रजातीचे नाव मुंबई शहराचे अस्तित्व सूचित करते. मुंबा या शब्दाचे मूळ मराठी भाषेतून आले असून या शहरातील रहिवाशांनी पूजलेल्या मुंबा आई या देवतेचा सन्मान करते. या शब्दाचा आदर म्हणून या नवीन प्रजातीचे नामकरण मुंबा असे करण्यात आल्याचे तेजस ठाकरे यांनी सांगितले आले.

डेटा पुरेसा नाही
रक्तामिथिसच्या इतर ज्ञात प्रजातींपासून २१.६ – २२.८ % च्या अनुवांशिक अंतराने, भारतातील वर्णन केलेल्या वंशाची ही पाचवी प्रजाती आहे. यापूर्वी हायपोजेनिक (Hypogean) आणि कॅव्हरनीकोलस (cavernicolus) प्रजाती आणि त्यांच्या अधिवास प्रणालींचा पुरेसा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे या प्रजातीचे संवर्धन धोरण तयार करण्यासाठी उपलब्ध डेटा पुरेसा नाही, असे ही सांगण्यात आले.

कोण आहे तेजस ठाकरे
तेजस ठाकरे यांचे शालेय शिक्षण माहीममधील बॉम्बे स्कॉटिश शाळेत झाले आहे. तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले आहे. वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांशी जोडले आहेत.

हेही वाचा - तेजस ठाकरे अन् सहकाऱ्यांनी शोधली पालीची दुर्मिळ प्रजात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.