ETV Bharat / city

शिक्षकांचे अनोखे आंदोलन, दहावीच्या निकालासाठी दंड भरून शिक्षकांचा लोकलने प्रवास

author img

By

Published : Jun 14, 2021, 12:55 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्याने अनेक शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांसमोर एक अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

शिक्षकांचे अनोखे आंदोलन
शिक्षकांचे अनोखे आंदोलन

मुंबई - दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्याने अनेक शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांसमोर एक अनोखे आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांनी सेल्फी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. याशिवाय शिक्षकांनी दंड भरून लोकल प्रवास करत शाळा गाठली आहे.

शिक्षकांचे अनोखे आंदोलन, दहावीच्या निकालासाठी दंड भरून शिक्षकांचा लोकलने प्रवास

शिक्षकांनी केले सेल्फी आंदोलन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचे राज्य मंडळाने ठरविले. त्याबाबतचे शासन निर्णय व शिक्षण मंडळाचे आदेश शाळांना प्राप्त झाले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार दहावीचे मूल्यमापन कसे करावे याबाबत राज्यातील शिक्षकांना शिक्षण मंडळाने प्रशिक्षण दिले. त्यानुसार मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे, विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करून शिक्षकांनी अंतिम निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करण्यासाठी ११ ते २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे हे मूल्यमापन करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. मात्र शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शिक्षक संघटनांनी लोकल प्रवासात शिक्षकांना परवानगी द्यावी याबाबद गेल्या 15 दिवसांपासून अनेकदा मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मध्य व पश्चिम रेल्वे व्यवस्थापक, मुंबई मनपा आयुक्त, मुंबई महापौर यांच्यासोबतच मनपा विरोधीनेते, मुख्य सचिव, एसएससी बोर्ड अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. तरी सुद्धा आतापर्यंत लोकल प्रवासात शिक्षकांना प्रवासासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्याविरोधात आता शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत सेल्फी आंदोलन केले आहे.

शासनाने शिक्षकांचा दंड भरावा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार दहावीच्या निकालाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता शाळेत जाण्यासाठी आपल्याला उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची परवानगी मागत आहोत. परवानगी मिळवण्यासाठी पत्र देऊन विनंती केलेली आहे. सर्वच स्तरावर सतत प्रयत्न करत आहोत. मात्र अद्यापही रेल्वे प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आजपासून सर्व शिक्षक आपल्या घराजवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन सेल्फी आंदोलन केले आहे. याशिवाय आज दंड भरून लोकल प्रवास केला आहे. आता राज्य सरकारने मुंबई आणि उपनगरातील लोकल प्रवासात परवानगी द्यावी, अन्यथा पुढील 15 दिवस शिक्षकांचा दंड रेल्वेला शासनाने भरावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

महिला शिक्षिकांना मोठा त्रास
मुंबईत काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, नवी मुंबई आणि पनवेल अशा दूरच्या ठिकाणी राहतात. यामध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त आहे. आज आम्ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि दहावीचा निकाल लवकरात लवकर लागावा याकरिता आम्ही आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र हे कर्तव्य बजावत असताना शासनाने सुद्धा आमच्या लोकल प्रवासाबद्दल विचार करायला पाहिजे होता. मात्र, शासनाने आम्हाला लोकल प्रवासापासून वंचित ठेवले आहे. मात्र, तरीही आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. याकरीता आम्ही रेल्वेचा दंड भरून शाळेत जात आहोत, अशी माहिती महिला शिक्षकांनी दिली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणप्रश्नी सरकार सकारात्मक- श्रीमंत शाहू छत्रपती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.