ETV Bharat / city

Tardeo Fire Mishap : कमला इमारत आग प्रकरणी पालिकेकडून समिती गठीत, दिले 'हे' निर्देश - कमला इमारत आग मराठी बातमी

भाटिया रुग्णालयाजवळ कमला इमारतीत 18 मजल्यावर आग ( Tardeo Fire Mishap ) लागली. त्यात 29 जण गंभीर झाले होते. यामधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश इकबाल सिंग चहल यांनी ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) दिले आहे.

Tardeo Fire Mishap
Tardeo Fire Mishap
author img

By

Published : Jan 23, 2022, 3:53 AM IST

मुंबई - ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत २९ जण जखमी ( Tardeo Fire Mishap ) झाले. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला ( Tardeo Fire Mishap Six Death ) आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे. पंधरा दिवसात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) आहेत.

6 जण दगावले

ताडदेव येथील भाटिया रुग्णालय जवळ कमला ही 20 मजली इमारत आहे. या इमारतीच्या १८ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास आग ( Tardeo Fire Mishap ) लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १३ फायर इंजिन, ८ जम्बो टॅंकर दाखल झाले. दुपारी 12.30 सुमारास आग नियंत्रणात आली. या घटनेत २९ जणांना भाटिया, कस्तुरबा, नायर रुग्णालयात दाखल केले. यातील ६ जणांचा मृत्यू झाला

चौकशी समिती नियुक्त

आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमण्याचे आणि पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले ( Tardeo Fire Mishap Sets Up Committee ) आहेत. त्यानुसार महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये डी विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा देखील समावेश आहे. आग लागल्याचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

२२३ इमारतींना नोटीस

महानगरपालिका वेळोवेळी उंच बहुमजली इमारतींमधील मंजूर आराखड्यानुसार संरचना आणि अग्नीशमन उपाययोजना व यंत्रणा यांचे वेळोवेळी स्वतःहून परिक्षण करत असते. अशा परीक्षणामध्ये अग्निशमन उपाययोजना व यंत्रणा यामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाते. १८ नोव्हेंबर २०२१ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये महानगरपालिकेने २२३ बहुमजली उंच इमारतींचे परीक्षण करून त्यांना 'महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन रक्षण उपाययोजना अधिनियम २००६' अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. अग्निशमन उपाय योजना यंत्रणा व साधनांचे ( Fire Fighting System ) योग्य रीतीने परिक्षण न करता त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या नोटिसा दिल्या आहेत.

उंच इमारतीमधील रहिवाशांना प्रशिक्षण
बहुमजली उंच इमारती मधील घडलेल्या आगीच्या दुर्घटना लक्षात घेता, मुंबई अग्निशमन दलाने देखील मुंबई महानगरातील वेगवेगळ्या परिसरात विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. त्यामध्ये अशा उंच इमारतींचे परीक्षण करण्यात आले. दुर्घटना प्रसंगी बचाव व मदत कार्य कसे करावे, त्याची रंगीत तालीम देखील ठिकठिकाणी करण्यात आली.

हेही वाचा - Nagpur Nude Dance Case : अश्लील विवस्त्र नृत्य प्रकरणात आयोजकांसह कलाकारांवर गुन्हा दाखल; तिघांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.