मुंबई - हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकांच्या दरम्यान रेल्वे सिग्नलिंगचे लोकेशन बॉक्समध्ये अज्ञान व्यक्तीने छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. परिणामी नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहेत.
वाहतूक पूर्ववत - मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6 वाजताच्या मध्य रेल्वेचा पनवेल किमी 48/13 येथे ट्रॅकजवळ सिग्नलिंग असलेले लोकेशन बॉक्स आणि केबल्सला छेडछाड केल्याने लोकेशन बॉक्स आणि केबल्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. रेल्वे या घटनेची चौकशी करत आहे. अद्यापही सिग्नलिंग असलेले लोकेशन बॉक्स आणि केबल्सला कोणीतरी छेडछाड केले याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
प्रवाशांना लागला लेटमार्क - ही घटना सकाळी घडल्याने कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना लेट मार्क लागलेला आहे. या घटनेमुळे अप आणि डाऊन मार्गाची लोकल वाहतूक अर्धा तास ठप्प होती. विस्कळीत झालेली होती. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवर सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांची मोठा प्रमाणात गैरसोय होत आहे.