मुंबई - काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय (Nana patole statement on narendra modi )वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मनात एवढा द्वेष का?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून मुंबई भाजपा यांचा तीव्र निषेध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेच्या श्रध्दास्थानी आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मनात एवढा द्वेष आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
हे ही वाचा - Chandrakant Patil On Nana Patole : नाना पटोलेंच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार : चंद्रकांत पाटील
बुधवारी उपोषणाला बसणार -
उद्या बुधवार १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.
हे ही वाचा - नाना पटोले, 'त्या' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा, माधव भांडारी यांचे खुले आव्हान