मुंबई - महापालिकेच्या वांद्रे येथील शाळेतील एका शिक्षकाने व्हॉट्सअप ग्रुपवर स्वतःचे व महिलांचे अश्लिल फोटो टाकल्याचा प्रकार निदर्शनास आणण्यात आला. याप्रकरणी या शिक्षकाला निलंबित किंवा बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे असे प्रकार पुन्हा कोणी करू नये, यासाठी त्या शिक्षकाला त्वरित निलंबित करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिले.
हेही वाचा... अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ
वांद्रे खेरवाडी येथील पालिकेच्या शाळेत गंगाप्रसाद तिवारी हा शिक्षक कार्यरत आहे. या शाळेतील शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिवारी आपले स्वतःचे आणि महिलांचे अश्लिल फोटो पोस्ट करत होता. हा प्रकार तेथील मुख्याध्यापकांना समजल्यावर त्यांनी त्याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीला दोन महिने झाले तरी अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचा मुद्दा नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे उपस्थित केला.
हेही वाचा... 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'
या शिक्षकाबाबत पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्या शिक्षकावर गंभीर आरोप असताना कारवाई करण्याचे सोडून तक्रार करणाऱ्या मुख्याध्यापकांची बदली करण्यात आल्याचे सातमकर यांनी निदर्शनास आणले. हा प्रकार गंभीर असल्याने त्या शिक्षकाचे त्वरित निलंबन करावे किंवा त्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी सातमकर यांनी केली. सातमकर यांनी उपस्थित केलेल्या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा देते शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
हेही वाचा.... पुणे : वाघोली येथील तलावात आई-मुलासह तिघांचा बुडून मृत्यू
याबाबत प्रशासनाकडून माहिती देताना त्या शिक्षकाची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी सांगितले. तर उपायुक्त आशुतोष सलील यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन काय कारवाई करायची त्याची माहिती शिक्षण समितीला देण्यात येईल असे सांगितले. यावर शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी, हा प्रकार गंभीर आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून त्या शिक्षकाचे निलंब करावे, असे निर्देश प्रशासनाला दिले. यापुढे असे प्रकार शिक्षण विभागात किवा पालिका शाळांमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही नाईक यांनी दिला.