मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ( Sushant Singh Rajput ) शेजारी राहणाऱ्या एका ड्रग्स तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( Narcotics Control Bureau ) अटक केली आहे. साहिल शाह ( 31 ) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स तस्कराचे ( Ncb Arrested Drug Peddler Sahil Shah ) नाव आहे. साहिल हा मागील काही महिन्यांपासून फरार होता.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित असणाऱ्या ड्रग्स केस प्रकरणी ( Sushant Singh Rajput Drug Case) एनसीबी चौकशी करत होती. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या एक आरोपीने सुशांतच्या शेजाऱ्याचे नाव घेतले होते. एनसीबी त्याला अटक करण्यासाठी गेली असता साहिल शाह हा फरारी झाला होता. त्यानंतर आता दुबईतून आल्यावर एनसीबीने त्याला अटक केली आहे.
दरम्यान, आता साहिल शाहला मागील वर्षी जप्त करण्यात आलेल्या ड्रग्स आणि सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी, सवाल विचारले जाणार आहे, अशी माहिती एनसीबीने दिली.
हेही वाचा -Fire Running Truck In Virar : थरारक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पेंढा वाहणाऱ्या वाहनाला भीषण आग