ETV Bharat / city

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण : वांद्रे पोलीस ठाण्यातील माहिती सीबीआय पथकाने घेतली - सीबीआय सुशांतसिंह प्रकरण

सीबीआयच्या इतर पथकांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. यात सुशांतसिंहच्या वांद्र्यातील घरात जेवण बनवण्याचे काम करणाऱ्या नीरज याची सीबीआयकडून चौकशी सध्या सुरू आहे.

सुशांतसिंह प्रकरण
सुशांतसिंह प्रकरण
author img

By

Published : Aug 21, 2020, 12:54 PM IST

Updated : Aug 21, 2020, 1:59 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून (सीबीआय) चौकशीसाठी 5 पथके बनविण्यात आली आहेत. यातील एक पथक मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. सुशांतसिंह प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे, पंचनामा, 56 व्यक्तींचे जबाब, सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित फॉरेन्सिक ऑडिट अहवाल, सुशांतचा पोस्ट मार्टम रिपोर्ट यासह इतर माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांशी सीबीआयचे पथक समन्वय साधत आहे.

वांद्रे पोलीस ठाण्यात सीबीआयचे पथक दाखल

हेही वाचा - अनिल देशमुख यांचा सावध पवित्रा; म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणावर अभ्यास करून बोलणार

दरम्यान, सीबीआयच्या इतर पथकांडून तपास सुरू करण्यात आला आहे. यात सुशांतसिंहच्या वांद्र्यातील घरात जेवण बनवण्याचे काम करणाऱ्या नीरज याची सीबीआयकडून चौकशी सध्या सुरू आहे. आता टप्प्याटप्याने या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. सध्या तपासाअंती सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी करण्यात येत असून पुढच्या टप्प्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतसिंहचा मित्र महेश शेट्टी, सिद्धार्थ पिठानी या सगळ्यांची चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे.

सीबीआयने ताब्यात घेतल्या 'या' वस्तू

सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांकडून काही गोष्टी सीबीआयच्या पथकाला देण्यात आल्या. सुशांतने आत्महत्येपूर्वी वापरलेला ज्यूसचा ग्लास, नाश्त्याची प्लेट, त्याचे तीन मोबाईल फोन, लॅपटॉप, अंगावरील कपडे सीबीआयच्या पथकाला देण्यात आले आहेत. या बरोबरच सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयकडे सोपवण्यात आले आहेत.

Last Updated : Aug 21, 2020, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.