मुंबई - विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते. प्रवीण दरेकर यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर किमान अनादर तरी करू नये, असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला. त्यांनी आज (गुरुवारी) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
हेही वाचा - निवडणूक आयोग हा स्वतंत्र, मात्र कोणताही घटक नाराज होणार नाही याची दक्षता घ्यावी - उपमुख्यमंत्री