ETV Bharat / city

'आरे'तील वृक्षतोडीला राष्ट्रवादीचा विरोध; सुप्रिया सुळे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

'आरे' येथे उभारण्यात येणाऱ्या कारशेड प्रकल्पाला नागरिकांचा विरोध आहेत. प्रकल्पाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याठिकाणी भेट दिली. तसेच याबाबत 12 तारखेला भेटणार असल्याचे सांगितले.

नागरिकांचा विरोध
author img

By

Published : Sep 8, 2019, 5:55 PM IST

Updated : Sep 8, 2019, 9:37 PM IST

मुंबई - पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, आरेतील वृक्षतोडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. आरेतील मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीप्रश्नी सुप्रिया सुळे १२ सप्टेबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रविवारी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी 'आरे'त उभारण्यात येणाऱ्या कारशेडची पाहणी केली

हेही वाचा - आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी भर पावसात आदिवासी नागरिकांची निदर्शने

सुप्रिया सुळे यांनी 'आरे'त उभारण्यात येणाऱ्या कारशेडची पाहणी केली. त्यावेळी त्यांना मेट्रो कारशेडच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा नकाशा दाखवला. प्रकल्पाचा नकाशा पाहून त्यांनी असमाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन मलिक यांनी आरेच्या वृक्षतोडी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे यावरून पर्यावरण प्रेमींनी सुप्रिया सुळेंना धारेवर धरले. तसेच मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.

मलिक यांनी विरोधात मतदान का केले याबाबत त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल, असे स्पष्टीकरण सुळे यांनी दिले. तर आज मी आरेतील नेमकी समस्या व स्थानिकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी आले असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरेत कोणतेही विकासकाम नको, आरेला 'ना विकास क्षेत्र' म्हणून घोषित करावे, अशी मागणी यावेळी पर्यावरण प्रेमींनी केली.

Intro:मुंबई - आरेतील मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 12 तारखेला भेट घेणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही. आरेतील वृक्षतोडीला राष्ट्रवादी पक्षाचा विरोध आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. आज आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.Body:सुप्रिया सुळे यांनी आरेत उभारण्यात येणाऱ्या कारशेडची पाहणी केली. त्यावेळी त्यांना मेट्रो कारशेडच्या अधिकार्यांनी दाखवलेल्या मेट्रो कारशेडचा नकाशा पाहून असमाधान व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन मलिक यांनी आरेच्या वृक्षतोडी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले , यावरून पर्यावरण प्रेमींनी सुप्रिया सुळेंना धारेवर धरले. तसेच मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मलिक यांनी विरोधात मतदान का केले याबाबत त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल असे स्पष्टीकरण सुळे यांनी दिले. तर आज मी आरेतील नेमकी समस्या व स्थानिकांना काय वाटत हे जाणून घेण्यासाठी आले असल्याचे सुप्रीया सुळे म्हणाल्या.
आरेत कोणतेही विकासकाम नको, आरे ना विकास क्षेत्र घोषित करावा अशी मागणी यावेळी पर्यावरण प्रेमींनी केली.
Conclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.