मुंबई - छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करत आहेत. छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते. दिल्लीतील रस्ते नावांनी बदलत आहेत. मात्र युपीतील मुघलायी ही आता पून्हा दिसू लागली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल जेव्हा आमच्या बहिणींवर आयकर विभागाने धाड टाकल्याबद्दल कळले तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही, झुकणार नाही -
दरम्यान मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तिन्ही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील. जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी खंबीर साथ दिली आहे. केंद्रसरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.
लखीमपूर घटनेचा निषेध -
लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे अशा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा - सगळं सांगणार, पण पाहुणे अजूनही घरातच... आयकर धाडीवर हे म्हणाले उपमुख्यमंत्री