ETV Bharat / city

Legislative Council Elections : शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंससिंह यांची बिनविरोध निवड - Mumbai Elections

काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुरेश कोपरकर ( Suresh Koparkar withdraw form in election ) यांनी आपला उमेदवारी अर्ज केवळ २४ तासात मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे आणि भाजपचे माजी आमदार राजहंस सिंह हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपने आपल्याला मताधिक्य मिळेल असा दावा केला होता.

शिवसेनेचे सुनील शिंदे भाजपचे राजहंस सिंह

author img

By

Published : Nov 25, 2021, 5:48 PM IST

Updated : Nov 25, 2021, 7:24 PM IST

मुंबई - मुंबई महापालिका मतदारसंघातून विधान परिषदेच्या दोन रिक्त जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. यापैकी काँग्रेस पुरस्कृत सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उरलेल्या दोन्ही उमेदवारांमधील शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई महापालिका मतदारसंघातून निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेमधील दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्यावतीने सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपच्यावतीने माजी आमदार राजहंस सिंह ( Ex BJP MLA Rajhans Singh ) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी ( congress supported candidate in Mumbai council election ) उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही रंगत चुरशीची होईल असे वाटत होते.

हेही वाचा-IT Raid : पुण्यात प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा

काँग्रेसच्या उमेदवाराने मागे घेतला अर्ज-

काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुरेश कोपरकर ( Suresh Koparkar withdraw form in election ) यांनी आपला उमेदवारी अर्ज केवळ २४ तासात मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे आणि भाजपचे माजी आमदार राजहंस सिंह हे बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुरेश कोपरकर ( Suresh Koparkar ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाचे मतदार फोडले जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. तर दुसरीकडे भाजपने आपल्याला मताधिक्य मिळेल असा दावा केला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उरलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.

हेही वाचा-ST Strike : भाजपाकडून आंदोलन स्थगिती, मात्र विलीनीकरणासाठी आंदोलन सुरूच राहणार

कोण आहेत सुनील शिंदे?
सुनील शिंदे हे ( Shivsena leader Sunil Shinde won council election ) वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी आमदार आहेत. शिवसैनिक, नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. मात्र, शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी आपला मतदारसंघ सोडला. माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यावर विजयी मिळवून ते आमदार झाले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आपल्यासाठी मतदारसंघाचा त्याग करणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केला.

हेही वाचा-Maharashtra Primary Schools : राज्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू

राजहंस सिंह यांना भाजपने दिली संधी

कॉंग्रेसचे मुंबईतील नेते असलेले राजहंस सिंह यांनी महापालिकेच्या गत निवडणुकीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवित पक्षातील निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना डावलून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती.

Last Updated : Nov 25, 2021, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.