मेष : सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे आपणास आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. कार्यक्षेत्री आपणास लाभ होईल.
उपाय : सूर्यास रोज सकाळी कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा.
वृषभ : सूर्य मकरेत आल्यामुळे आपली प्रकृती उत्तम राहील. आपणास नशिबाची साथ मिळेल. कोणतेही काम करण्यापूर्वी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे.
उपाय : रोज गाईस गुळ खावयास द्यावा.
मिथुन : सूर्य मकर राशीतून गोचरीने भ्रमण करत असताना आपणास वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाऊ नये. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल.
उपाय : रोज गायत्री चालिसाचे पठण करावे.
कर्क : सूर्य मकर राशीस आल्यामुळे वैवाहिक जोडीदाराशी किंवा व्यावसायिक भागीदाराशी आपले मतभेद होण्याची संभावना आहे. पोटाचे विकार संभवतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पैसा खर्च करावा लागेल.
उपाय : सूर्याशी संबंधित वस्तू दान कराव्यात.
सिंह : सूर्य मकर राशीस आल्यामुळे आपले शत्रू कमकुवत होतील. आपणास जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करू शकाल. आपल्या प्राप्तीत कपात तर खर्चात वाढ होऊ शकते.
उपाय : रोज सूर्याच्या एका मंत्राचा जप करावा.
कन्या : सूर्याचे मकर राशीतून गोचरीने भ्रमण असता घरात एखादे मंगल कार्य होण्याची संभावना आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. परंतु, मुलांशी संबंधित कोणत्याही कामात आपणास त्रास होऊ शकतो.
उपाय : रोज आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करावे.
तूळ : मकर राशीतून सूर्य भ्रमण करत असता आपले मन भरकटण्याची शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कामात आपणास फायदा होऊ शकणार नाही. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.
उपाय : रोज गायत्री मंत्राचा जप करावा.
वृश्चिक : मकर राशीस सूर्य आल्यामुळे आपणास घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान भावंडांशी नात्यात धीर धरावा लागेल.
उपाय : रोज आई - वडिलांचा आशीर्वाद घ्यावा.
धनु : सूर्य मकर राशीस आल्यामुळे पैतृक संपत्तीशी संबंधित विवाद आपणास त्रास देऊ शकतात. कुटुंबियांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा वाद होण्याची संभावना आहे.
उपाय : रोज सूर्याष्टकाचे पठण करावे.
मकर : सूर्य मकर राशीस आल्यामुळे आपण खूप उर्जावान व्हाल. परंतु, वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी संवाद साधताना आपणास खूप काळजी घ्यावी लागेल. आपले मतभेद वाढण्याची संभावना आहे.
उपाय : रोज भोजना नंतर गुळ खावा.
कुंभ : सूर्य मकर राशीस आल्यामुळे शत्रूं पासून सावध राहावे लागेल. परेदशाशी संबंधित व्यवसायासाठी अनुकूलता लाभेल. आपली प्रकृती उत्तम राहील.
उपाय : रविवारच्या दिवशी सूर्यास गुळाचा नेवेद्य दाखवावा.
मीन : सूर्याचे मकर राशीतील भ्रमण आपल्यासाठी अनुकूल असेल. समाजात आपली प्रतिष्ठा उंचावेल. प्राप्तीत वाढ करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
उपाय : रोज आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करावे.