ETV Bharat / city

Sujat Ambedkar Critisized Raj Thackeray : 'हनुमान चालिसा लावायला अमित ठाकरेंना पाठणार असाल, तर माझा शंभर टक्के पाठिंबा'

author img

By

Published : Apr 3, 2022, 7:21 PM IST

Updated : Apr 3, 2022, 8:06 PM IST

राज ठाकरे यांच्या या ( Raj Thackeray Statment On Hanuman Chalisa ) वक्तव्यावरून राज्यात राजकारण ढवळून निघाले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे ( VBA Leader Sujat Ambedkar ) युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे ( Sujat Ambedkar Critisized Raj Thackeray ) यांच्यावर टीका केली आहे. जर हनुमान चालिसा लावायला अमित ठाकरे स्वत: जाणार असेल तर राज ठाकरेंच्या वक्तव्याला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

Sujat Ambedkar Critisized Raj Thackeray
Sujat Ambedkar Critisized Raj Thackeray

मुंबई - मशिदीवर लावलेले भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू, असा इशारा गुढीपाडव्याच्या ( MNS GudiPadwa Melava ) निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray Statment On Hanuman Chalisa ) केले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून राज्यात राजकारण ढवळून निघाले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे ( VBA Leader Sujat Ambedkar ) युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे ( Sujat Ambedkar Critisized Raj Thackeray ) यांच्यावर टीका केली आहे. जर हनुमान चालिसा लावायला अमित ठाकरे स्वत: जाणार असेल तर राज ठाकरेंच्या वक्तव्याला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले.

सुजत आंबेडकर यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले सुजात आंबेडकर? - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे लागतील, तर त्याच्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लाऊ अस म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यावर आम्ही शंभर टक्के सहमत आहोत. परंतु हे स्पीकर लावण्यासाठी एकही बहुजन समाजातील मुलं जाता कामा नये, घोषणा तुम्ही करणार आणि बहुजन कार्यकर्ता त्यात भरडणार जाणार नाही. हनुमान चालीसा म्हणाला जाण्या अगोदर लोकांनी टी शर्ट काढून जानवं दाखवावे, अन त्यानंतरच हनुमान चालीसा म्हणावे, असा टोला सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

'हनुमान चालीसा अमितला म्हणायला लावा' - तुम्ही शरद पवारांचा इंटरव्यू घ्या, तुम्ही स्वतःचा पक्ष भाड्याने लाऊन दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीमच्या दंगलीवर उभा करू नका, अशी विनंती सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना केली. यासोबतच स्पीकर लावण्यासाठी आपले पुत्र अमित ठाकरे यांना पाठवा आणि आधी अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणाले लावा, राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगली झाली, तर पोलिसांना माहीत आहे की पकडायचे कोणाला, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरुन घसरले; 2 जखमी

Last Updated : Apr 3, 2022, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.