ETV Bharat / city

President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून 200 पेक्षा अधिक मतांनी निवडून आणू- सुधीर मुनगंटीवारांचा दावा - President election

मतदान कसं करावं ,मतदान काय रीतीने करावं, म्हणजे मत वाया जाणार नाही. मत बाद होणार नाही. त्यासाठी काय खबरदारी घ्यावी, अशा अनेक सूचना आमदारांना दिल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. तसेच त्यांनी विश्वासही व्यक्त केला की ,राज्यातून द्रौपदी मुर्मू यांना 200 पेक्षा अधिक मतं हे आम्ही मिळून दाखवणार आहोत.

सुधीर मुनगंटीवारांचा दावा
सुधीर मुनगंटीवारांचा दावा
author img

By

Published : Jul 18, 2022, 6:56 AM IST

Updated : Jul 18, 2022, 9:32 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटाचे सर्व आमदार भाजपाचे सर्व आमदार हॉटेल ट्रायडेंट येथे रविवारी जमले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 200 पेक्षा अधिक मतांनी निवडून आणू, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला आहे. ते हॉटेल ट्रायडेंट येथे भाजपा आणि शिंदे गट यांच्या डिनर डिप्लोमासी बैठकी दरम्यान बोलत होते.

राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी समाजातून अर्थात तळागाळातील समाजातून एक महिला उमेदवार उभी राहिलेली असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्यातून 200 पेक्षा अधिक मतांनी त्यांना निवडून कशा येतील याबाबत या हॉटेलमध्ये सर्व आमदारांचे प्रशिक्षण घेण्यासाठी येथे आम्ही जमलेलो होतो,असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. मतदान कसं करावं ,मतदान काय रीतीने करावं, म्हणजे मत वाया जाणार नाही. मत बाद होणार नाही. त्यासाठी काय खबरदारी घ्यावी, अशा अनेक सूचना आमदारांना दिल्याचे मुनगंटीवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. तसेच त्यांनी विश्वासही व्यक्त केला की ,राज्यातून द्रौपदी मुर्मू यांना 200 पेक्षा अधिक मतं हे आम्ही मिळून दाखवणार आहोत.

सुधीर मुनगंटीवारांचा दावा

यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी हा केला होता दावा - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केला आहे, २०० आमदार मतदार करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ( CM Eknath Shinde On Presidential Election 2022 Droupadi Murmu ) केलं.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री' - मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केलेला आहे, २०० आमदार मतदार करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत. आदिवासी समाजाला या देशाच्या सर्वोच्च स्तरावर बसवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचे स्वागत सर्वांनी केलेल आहे. काही लोकांनी जाहीरपणे केलं आहे. काही लोकांनी मनापासून केलं आहे. यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने द्रौपदी मुर्मू जिंकतील. ही निवडणूक आता फक्त एक औपचारिकता आहे. ही निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकलेलीच आहे, असा प्रतिसाद संपूर्ण राज्यातून भेटत आहे.

असे आहे निवडणुकीतील मतांचे गणित - राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे १७५ तर सरसकट खासदारांच्या मताचे मूल्य हे ७०० आहे. राज्यातील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५०,४०० असले तरी एक जागा रिक्त असल्याने हे मूल्य ५०,२२५ झाले आहे. विधानसभेत विश्वास दर्शक ठराव आणि अध्यक्षांच्या निवडणुकीत शिंदे गट भाजपला १६४ आमदारांचे समर्थन लाभले होते. महाविकास आघाडीचे संख्याबळ ११० पर्यंत घटले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला राज्यातून १६५ पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन लाभेल असे भाजप नेत्यांचे गणित आहे. शिंदे गटाच्या ५० आमदारांचा पाठिंबा भेटल्यास भाजपच्या मतमूल्यात राज्यात ८७५० ची वाढ होणार आहे. ही निवडणूक जिंकून येण्यासाठी देशातून एकंदरीत ५ लाख ५० हजार च्या आसपास इतके मतमूल्य लागणार आहे.

हेही वाचा - Vice President Election 2022: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचा यूपीएला पाठिंबा

Last Updated : Jul 18, 2022, 9:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.