मुंबई देशातील रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) संपूर्ण देशासाठी 400 सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन (vande bharat trains) चालवण्याची तयारी केलेली आहे. दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, हरियाणा तसेच महाराष्ट्रात देखील मुंबईपासून गुजरातमधील अहमदाबादापर्यंत वंदे भारत ट्रेनची (Mumbai Ahmedabad Vande Bharat Express) तयारी रेल्वे मंत्रालयाने केली होती. त्याचाच एक भाग म्हणून काल अहमदाबाद ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची जलद चाचणी (trial run) घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली.
देशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस (made in india vande bharat express) वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी तयार केलेली सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन (Self propelled train) प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव आणि अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी उत्तम सुविधांनी सुसज्ज आहे. काल प्रथमच अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर या ट्रेनची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. अत्यंत जलद धावणारी वंदे भारत ट्रेन म्हणून तिची ख्याती आहे.
वंदे भारत एक्सप्रेस वेग किती ? सर्वात पहिले वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती. त्यानंतर दिल्ली ते कटरा या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली गेली. आणि आता तिसरी मुंबई अहमदाबाद मार्गावर ही वंदे भारत ट्रेन चालवली गेली आहे. अधिकचा वेग 180 किलोमीटर प्रति तास असा आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे अधिकारी सक्सेना यांनी या बातमीला दुसरा देत अहमदाबाद मुंबई अति जलद वंदे भारत ट्रेनची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले.