मुंबई - राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल, असं त्यांनी सांगितले.
हे ही वाचा - Maharashtra Rain : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो धीर सोडू नका.. सरकार तुमच्या पाठिशी, आपत्तीतून बाहेर काढू - मुख्यमंत्री
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा पुन्हा देण्यात संधी दिली आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, अशी ग्वाही देखील सामंत यांनी दिली.