नवी मुंबई - नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी महाविद्यालयात ( Shetkari Mahavidyalay Ghansoli ) तब्बल सोळा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह ( 16 Students Found Corona Positive ) आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दोन दिवसात 16 विद्यार्थ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून ( Mumbai Municipal Corporation ) विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी ( Corona Test ) करण्यात येत आहे.
एका विद्यार्थ्यांचा नातेवाईक परदेशातुन आल्याची माहिती -
नवी मुंबईमधील घणसोली येथील शेतकरी विद्यालयात सोळा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा नातेवाईक परदेशातून आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्या नातेवाईकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोळा विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आहे. शनिवारी 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मिळाली आहे.