ETV Bharat / city

युक्रेनहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच क्वारंटाईन केले जाणार - किशोरी पेडणेकर - युक्रेन विद्यार्थी मुंबईत कोरोना चाचणी

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू (Russia Ukraine Crisis) झाले आहे. युक्रेनवर हल्ला झाल्याने अनेक देशातील नागरिक तिथे अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्याचे काम सुरू आहे. मुंबई आणि राज्यातील विद्यार्थी तसेच नागरिकही युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नाने मायदेशी आणले जात आहेत.

Kishori Pednekar
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Feb 26, 2022, 3:12 PM IST

Updated : Feb 26, 2022, 3:43 PM IST

मुंबई - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू (Russia Ukraine Crisis) झाल्याने राज्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नाही त्यांची मोफत कोरोना चाचणी करून घरी क्वारेंटाईन केले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

युक्रेनहून पहिले विमान येणार -

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युक्रेनवर हल्ला झाल्याने अनेक देशातील नागरिक तिथे अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्याचे काम सुरू आहे. मुंबई आणि राज्यातील विद्यार्थी तसेच नागरिकही युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नाने मायदेशी आणले जात आहेत. त्यामधील पहिले विमान आज सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान मुंबई विमानतळावर येणार आहे. यामधून विद्यार्थीही मायदेशी परतत आहेत.

युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना घरीच क्वारंटाईन करणार -

मुंबईत आलेल्या प्रवाशांपैकी ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत त्यांच्यावर बंधन नाही. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांची मोफत कोरोना चाचणी करून घरी क्वारेंटाईन केले जाईल. त्यांना मानसिक आधार देण्याचे, जेवण देण्याचे काम महापालिका करेल. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मोफत कोरोना चाचणी -

युक्रेनमधून येणार्‍या भारतीयांसाठी मुंबई विमानतळ परिसरात विशेष कॉरिडॉर करण्यात आला आहे. त्यांचे आगमन झाल्यावर कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र, आरटी-पीसीआर निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे जर कोणताही प्रवासी आगमनाच्या वेळी कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही, तर त्यांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल, तो खर्च विमानतळाद्वारे केला जाईल. चाचणी निगेटिव्ह झाल्यानंतर हे प्रवासी विमानतळावरून बाहेर पडू शकतील. कोणत्याही प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, सरकारने घालून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार त्यांचे वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थापन केले जाईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Feb 26, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.