ETV Bharat / city

धक्कादायक ! मुंबईत 'ई हुक्का पेन'चा विद्यार्थ्यांना विळखा - जनजागृती

तंबाखू सेवनापासून रोखण्यासाठी सरकारकडून विविध संघटनांकडून जनजागृती देखील केली जाते. मात्र तरीही तंबाखू सेवनाचे वाढत चालले आहे. आता तर मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये हुक्का पेनचे ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई
author img

By

Published : May 31, 2019, 1:07 AM IST

Updated : May 31, 2019, 12:16 PM IST

मुंबई - जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे जगभरात साजरा केला जातो. तंबाखू सेवनापासून रोखण्यासाठी शासनाकडून विविध संघटनांकडून जनजागृती देखील केली जाते. मात्र तरीही तंबाखू सेवनाचे वाढत चालले आहे. आता तर मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये ई हुक्का पेन ओढण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती देताना सलाम बॉम्बेच्या पदाधिकारी

सरकारने रेस्टॉरंट व पार्लरमध्ये हुक्का बंदी केली आहे. तरीही ई हुक्क्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढल्याची धकायदायक बाब एका सर्व्हेनुसार उघड झाली आहे. बारीक स्केच पेनमधून हुक्का पिण्याचे प्रमाण शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. शाळेत प्रथम याची भनक देखील कधी कोणाला लागली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ई हुक्का ओढताना विद्यार्थी पकडले गेल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर ई हुक्क्याचे अधिकाअधिक प्रमाण वाढत चालले आहे. हे लक्षात घेता यावर एका संस्थेच्या सर्व्हेनुसार याचे प्रमाण मुंबईत वाढल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

सलाम बॉम्बे फाउंडेशन या गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून तंबाखूविरोधी काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ई-हुक्क्याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्व्हे केला. त्यानुसार, मुंबईत ई हुक्का ओढण्याचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांपैकी 33 टक्के तरुणांमध्ये प्रमाण आढळून आले आहे. त्यामध्ये 15 टक्के इतकी मुलं रोज ई हुक्का ओढत आहेत. मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक आहे. हे फार धक्कादायक असल्याची माहिती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी बाजारात हुक्का पेन नावाची हुबेहूब पेन सारखी दिसणारी वस्तू मुलांना अगदी सहज मिळत असल्याचे उघडकीस आले होते. या ई हुक्क्यात सुगंधी द्रव्ये वापरली जातात. त्यामध्ये काही प्रमाणात निकोटिन असते. मुलांना ई हुक्क्याची सवय लागली, की त्यातील सुगंधी द्रव्याची जागा तंबाखूजन्य सिगरेटस कधी घेते हे मुलांच्या ध्यानात येतच नाही. मग या हुक्का पेनची सवय मुलांना जडू लागते हे वाईट आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही. व्यसनाची पहिली पायरी म्हणून ई हुक्क्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मुळावरच घाव घालण्याची गरज असताना देखील सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली पिढी सध्या हुक्का पार्लर बंद असल्यामुळे ई हुक्क्याकडे आकर्षित होताना दिसते. त्यामुळे या ई हुक्का कंपन्यांवर बंदी आली पाहिजे, नाही तर याचे मोठे परिणाम तरुणाईला भोगावे लागतील असे सलाम बॉम्बेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ई हुक्का पेन नक्की काय आहे ?

ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगरेट. पेनासारखे दिसणाऱ्या या उपकरणांमध्ये सिगरेटमधील तंबाखू ऐवजी द्रवरूपातील निकोटीनचा समावेश असतो. याला काडीपेटी किंवा लाईटरने पेटवण्याची आवश्यकता नसते. ही सिगारेट बॅटरीवर चालते. यामधील बटन सुरू केले, की द्रवरूपातील निकोटीनची वाफ बनते आणि ती सिगरेट प्रमाणे तोंडावाटेने ओढली जाते. सिगारेट पेटवली जात नसल्याने याची राख तयार होत नाही. यामध्ये द्रवरूपातील निकोटीन भरण्याची सोय असते. याचा सिगरेटप्रमाणे वास देखील येत नाही. यात विविध प्रकारच्या फ्लेवर्समध्ये चवही मिळते.

या ई-हुक्याचे सेवन हे मुलांमध्ये वाढत असल्याने सरकारने यावर ठोस उपाय करायला हवेत. अन्यथा ई हुक्क्याचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनात रूपांतर होईल हे कळणार नाही. व बघता-बघता तरुणाई उद्धवस्त होऊन जाईल. त्यामुळे सरकार व सर्वांनीच याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत सर्व्हेक्षण केलेल्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Intro:धक्कादायक ! मुंबईत ई हुक्क्याचे विद्यार्थ्यांमध्ये प्रमाण वाढले

31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस जगभरात शासनाकडून विविध संघटनांकडून साजरा केला जातो. तंबाखू सेवनापासून रोखण्यासाठी शासनाकडून विविध संघटनांकडून जनजागृती देखील केली जाते .परंतु दिवसेंदिवस तंबाखू सेवनाचे प्रमाण कोणत्या ना कोणत्या मार्गे वाढत चालले आहे.
सरकारने रेस्टॉरंट मध्ये व पार्लरमध्ये हुक्का बंदी झाली आहे. तरीही इ हुक्क्याचे प्रमाण शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढले असल्याचे धकायदायक बाब एका सर्व्हे नुसार बाहेर आली आहे. बारीक पेन स्केच यामधून हुक्का पिण्याचे प्रमाण शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे .शाळेत प्रथम याची भनक देखील कधी कोणाला लागली नाही. परन्तु काही दिवसांपूर्वीचं ई हुक्का ओढताना विद्यार्थी पकडले गेल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर इ हुक्कयाचे अधिकाअधिक प्रमाण वाढत चालले आहे हे लक्षात घेता यांवर एका संस्थेच्या सर्व्हेनुसार याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Body:सलाम बॉम्बे फाउंडेशन या गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून तंबाखूविरोधी काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ई-हुक्क्याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्व्हे केल्यानुसार , मुंबईत ई हुक्का ओढण्याचे प्रमाण हे एकूण विद्यार्थ्यांपैकी 33% इतक्या तरुणांमध्ये याचे प्रमाण आढळून आले आहे. त्यामध्ये 15 टक्के इतकी मुलं रोज ई हुक्का ओढतायेत. मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण काढण्यात अधिक आहे .हे फार धक्कादायक आहे याची माहिती फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी दिली.

सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी बाजारात हुक्का पेन नावाची हुबेहूब पेन सारखी दिसणारी वस्तू मुलांना अगदी सहज मिळत असल्याचे उघडकीस आले होते .या ई हुक्क्यात सुगंधी द्रव्ये वापरली जातात त्यामध्ये काही प्रमाणात निकोटिन असते .मुलांना ई हुक्क्याची सवय लागली की त्यातील सुगंधी द्रव्याची जागा तंबाखूजन्य सिगरेटस कधी घेते हे मुलांच्या ध्यानात येतच नाही .आणि मग या हुक्का पेन ची सवय मुलांना जडू लागते हे वाईट आहे. हे लोकांचा लक्षात येत नाही आहे. व्यसनाची पहिली पायरी म्हणून इ हुक्क्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मुळावरच घाव घालण्याची गरज असताना देखील सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नाही .त्यामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली पिढी सध्या हुक्का पार्लर बंद असल्यामुळे ई हुक्क्याकडे आकर्षित होताना दिसते .त्यामुळे या ई हुक्का कंपन्यांवर बंदी आली पाहिजे नाहीतर याचे मोठे परिणाम तरुणाईला भोगावे लागतील असे सलाम बॉम्बेच्या पदाधिकारी यांनी सांगितले.

ई हुक्का पेन नक्की काय आहे?

ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगरेट .पेना सारखे दिसणाऱ्या या उपकरणांमध्ये सिगरेटमधील तंबाखू ऐवजी द्रवरूपातील निकोटीन चा समावेश असतो. याला काडीपेटी किंवा लाईटरने पेटवण्याचे आवश्यकता नसते. ही सिगारेट बॅटरीवर चालते यामधील बटन सुरु केले की द्रवरूपातील निकोटीनची वाफ बनते आणि ती सिगरेट प्रमाणे तोंडावाटेने ओढली जाते . सिगरेट पेटवली जात नसल्याने या राख तयार होत नाही. यामध्ये द्रवरूपातील निकोटीन भरण्याची सोय असते .याचा सिगरेट प्रमाणे वास देखील येत नाही.यात विविध प्रकारच्या फ्लेवर्स मध्ये चवही मिळते.

या ई-हुक्याचे सेवन हे मुलांमध्ये वाढत असल्याने सरकारने यावर ठोस उपाय करायला हवेत. अन्यथा या ई हुक्कयाचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कधी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनात रूपांतर होईल हे कळणार नाही. व बघताबघता तरुणाई उध्वस्त होऊन जाईल त्यामुले सरकार व सर्वांनीच याकडे लक्ष दिले पाहिजे असं मत सर्व्हेक्षण केलेल्या सलाम बॉम्बे फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

Conclusion:ई हुक्का ओढताना व्हिज्युअल मागील एका बातमीत पाठवले होते ते वापरावेत किंवा आता पाठवलेत ते चेहरे ब्लर करून वापरावेत
Last Updated : May 31, 2019, 12:16 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.