ETV Bharat / city

Pratiksha Tondwalkar : सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर; वाचा प्रेरणादायी कहाणी - प्रतीक्षा तेंडळकरांचा संघर्ष

37 वर्षांपूर्वी प्रतीक्षा तोंडवळकर ( Pratiksha Tondwalkar ) स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India ) म्हणजे ( SBI ) मध्ये सफाई कामगार म्हणून मध्ये रुजू झाल्या होत्या. आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर झाल्या आहेत. एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची त्यांची कहाणी विलक्षण आहे.

Etv BharatPratiksha Tondwalkar
Etv Bharप्रतीक्षा तोंडवळकरat
author img

By

Published : Aug 6, 2022, 6:54 PM IST

मुंबई - सातवी पास असलेल्या प्रतीक्षा तोंडवळकर ( Pratiksha Tondwalkar ) यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ( State Bank of India ) सफाई कामगार म्हणून कामाची सुरुवात केली. मात्र, आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. "मेहनतीला कोणताही पर्याय नसतो" असं वाक्य अनेकदा आपल्या वाचनात आल असेल किंबहुना अनेक वेळा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून हे वाक्य ऐकत आलो आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक लोकांचा आदर्श आपण पाहत आलोय. मात्र, यशासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता या आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात.

अपार कष्ट करून केले धेय्य साध्य - आपल्याला हवं ते ध्येय संपादन करण्यासाठी परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक मोर्चांवर लढाई लढावी लागते, जिंकावीही लागते. असंच आपलं ध्येय संपादन करण्यासाठी अपार कष्ट करणार सामान्य महिलेचे नाव म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर हे आहे. 57 वर्षीय प्रतीक्षा तोंडवळकर ह्या आज एका प्रतिष्ठित सरकारी बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतात. मात्र, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम हे असामान्य आहेत. प्रतीक्षा तोंडवळकर या सध्या मुंबईत सांताक्रूझ या ठिकाणी राहत असून बांद्रा येथील प्रतिष्ठित सरकारी बँकेमध्ये जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. मात्र आज जरी त्या बँकेच्या जनरल मॅनेजर असल्या तरी त्यांनी आपल्या बँकेची कारकीर्द ही सफाई कामगार म्हणून सुरू केली होती.

बँकेत होत्या चपराशी - प्रतीक्षा तोंडवळकर यांचा वयाच्या 17 व्या वर्षी सदाशिव कडू यांच्याशी 1981 साली लग्न झाले. त्यांचे पती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ( State Bank of India ) बायंडरचे काम करायचे. मात्र, 1984 साली त्यांच्या पतीचे आकस्मित निधनानंतर प्रतीक्षा तोंडवळकर यांचं सर्व जगत हरपल होत. वय वर्ष केवळ 20 असतांना पदरात दोन मुले होती. पतीची साथ सुटलेल्या प्रतीक्षा तोंडवळकर यांना त्यावेळी नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. त्यातच शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालं असल्याने नोकरी कोणती शोधायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असताना पती काम करत असलेल्या बँकेत त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची नोकरी करण्यास सुरुवात केली. पती हयात असताना त्यांनी नेहमीच प्रतिक्षा तोंडवळकर यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं होतं. तीच प्रेरणा त्यांनी आपल्या सोबत कायम ठेवली. नोकरी करता करता त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कारण आयुष्यात पुढे जायचं असेल तर शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे हे त्यांच्या पत्नी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे आपलं, आपल्या मुलांचे भविष्य चांगलं करायचं असेल तर, शिक्षणाशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही त्याची कल्पना प्रतीक्षा तोंडवळकर यांना होती. त्यामुळे नोकरी, घर यासोबतच शिक्षण त्यांनी सुरू ठेवलं.

ट्रैनी ऑफिसर म्हणून सिलेक्ट- दहावी उत्तीर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात ( SNDT College ) त्यांनी प्रवेश घेतल. या महाविद्यालयात त्यांनी आपलं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कॉमर्स मधून पदवी ( Degree in Commerce ) प्राप्त केल्यानंतर बँकेत त्यांना पहिल्यांदा क्लर्क म्हणून रुजू झाल्या. मात्र, क्लर्क म्हणून काम करत असताना देखील अंतर्गत परीक्षासाठी त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. अंतर्गत परीक्षा पास करून पहिल्यांदा त्या ट्रैनी ऑफिसर म्हणून सिलेक्ट ( Selection as Trainee Officer ) झाल्या. त्यानंतर एकेक पदावर बढती मिळवत त्यांनी आज बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरची ( Assistant General Manager ) पदवी मिळवली. त्यांचा हा सर्व प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मात्र त्या स्वतः शिकत असताना आणि आपल्या मुलांसाठी शिक्षण कुठे थांबू दिलं नाही. त्यांचा मोठा मुलगा विनायक मुंबई आयआयटी येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्या नंतर पुण्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहे. तर, त्यांची मुलगी दीक्षा व्यवसाय करते. या दरम्यानच त्यांनी प्रमोद तोंडवळकर यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, आपल्या दुसऱ्या विवाहानंतर देखील त्यांनी आपली मुलं, जबाबदारी या चौख पार पाडल्या. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पती प्रमोद तोंडवळकर यांची मोलाची साथ त्यांना लाभली.

समस्या त्वरित सोडवाव्यात - पतीचे झालेला आकस्मित निधनामुळे आपल्यासमोर मोठी समस्या उभी राहिली होती. आपण आता पुढचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न समोर असताना समस्येपासून पळून न जाता त्याच्याशी दोन हात करणे गरजेचे आहे. त्यामुळे या समस्येतून आपणच मार्ग काढायचा असा निश्चय प्रतीक्षा तोंडवळकर यांनी केला. त्या समस्येतून धैर्याने आपण बाहेर पडलो. मात्र सध्याची तरुण पिढी लवकर नैराश्याच्या छायेत जाते. समस्येतून मार्ग काढण्याऐवजी समस्ये पासून दूर पळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, समस्या पासून दूर पळून समाधान मिळणार नाही प्रत्येक तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. समस्यांच्या मुळाशी जाऊन समस्या सुरू होतानाच ती मोठी होऊ नये, याची दक्षता सर्व तरुणांनी घेतली पाहिजे. त्यामुळे आयुष्यात मोठ्या अडचणी निर्माण होत नाहीत. तसेच सध्या सुरू असलेले सोशल मीडियावरचे आयुष्य हे भ्रम आहे. तरुणांनी वास्तव्यात जगायला शिकलं पाहिजे. इंटरनेट, सोशल मिडियाचा हे चांगल्या साठी वापरलं जाणं गरजेचं आहे, असा मोलाचा सल्ला प्रतीक्षा तोंडवळकर यांनी तरुणांना दिला आहे.

हेही वाचा - Model Molestation Case : मॉडेलचा विनयभंग; स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहतावर गुन्हा दाखल

निवृत्तीनंतर समाजकार्यात स्वतःला झोकून देणार- आयुष्यभर आपण खूप संघर्ष केला असला तरी, या आयुष्याने आपल्याला खूप काही दिलं आहे. मात्र, आता समाजाला काहीतरी देण्याची वेळ आली असल्याचे मत प्रतीक्षा तोंडवळकर व्यक्त करतात. निवृत्तीनंतर जनतेची सेवा करण्याचा ध्यास असून सामाजिक संस्थेचे जोडला जाऊन आपण समाजकार्य करणार असल्याचं प्रतीक्षा तोंडवळकर यांची इच्छा आहे. तसेच तरूण आणि वृद्धांना योगासनाचे मोफत धडे देण्यासाठी देखील त्यांची भविष्यात कल्पना आहे.

माझी आईच माझा आयडॉल - अगदी लहानपणापासून आपण आपल्या आईचा संघर्ष पाहिलेला आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीवर कशी मात करायची हे आपल्या आईने आपल्याला शिकवले आहे. त्यामुळे आपल्याला जगातल्या कोणत्याही आयडॉलची गरज नाही. माझी आईच माझा आयडॉल आहे. प्रत्येक व्यक्तीच्या काही जबाबदारी असतात आणि त्या जबाबदारीने त्या व्यक्तीने कसं वागावं हे मला माझ्या आईने शिकवलं असल्यासही विनायक तोंडवळकर मोठ्या अभिमानाने सांगतात.

हेही वाचा - Ajit Pawar : अधिकार सचिवांना मग मुख्यमंत्री घरी बसणार का?; अजित पवारांनी डिवचले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.