मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात बंधनकारक आहे. मात्र, काही प्रवाशांकडून विलगीकरणापासून पळवाटा शोधून नियम धाब्यावर धरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने नवी सुधारित नियमावली जारी केली आहे. त्यामुळे नियम धाब्यावर धरल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाई -
मुंबई विमानतळावर विदेशातून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी २१ डिसेंबर व २७ डिसेंबर रोजी २०२० रोजीच्या आदेशानुसार कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणा-या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशांकडून नियमाची अंमलबजावणी केली जात नसून गैरप्रकार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने सुधारित कडक नियमावली जारी केली असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे नियम धाब्यावर धऱणाऱ्य़ा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा -आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस
असे असणार नियम -
- सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये विलगीकरणासाठी असलेल्या हॉटेलमध्ये प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती
- विलगीकरणाशी संबंधित नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
- हवाईमार्गे विदेशातून येणा-या प्रवाशांसंदर्भात विमानतळावर नेमलेल्या कर्मचाऱयांच्या पथकाने दररोज यादी तयार करावी.
- प्रवाशांच्या वाहतुकीसाठी नेमलेल्या बेस्ट बसेसद्वारे नेण्याची व्यवस्था करावी. संबंधित बेस्ट बसच्या वाहनचालकास देखील प्रवाशांची यादी देणे
- संबंधित बेस्ट बस चालकाने प्रवाशांना त्यांनी निवडलेल्या हॉटेलमध्येच नेऊन सोडावे आणि संबंधित प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचल्याबाबतची पावती त्या-त्या हॉटेलकडून घ्यावी.
हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी नियमावली मात्र विविध स्तरातून तीव्र विरोधच