मुंबई - दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्यावतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम सुरू ( Girgaon Chowpatty Viewer Gallery ) आहे. परंतु हे बांधकाम अनधिकृत असून, यावर तातडीने लक्ष द्यावे व कारवाई करण्यात यावी असं पत्र भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) यांना लिहिले ( Nitesh Rane Letter To BMC Commissioner ) आहे.
काय आहे पत्रात? : मुंबईला पर्यटनाच्यादृष्टीने सुशोभित करून पर्यटनकांना आकर्षित केलेच पाहिजे, ही आमचीपण भूमिका आहे. पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये. हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी MRTP कायद्याने आपल्यावर टाकली आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे. या गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्यावर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे.
हे बांधकाम अनधिकृत आहे? : सदर पक्के बांधकाम कुठलेही CRZ नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून पिलर्स बांधून केले गेले आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाले आहे. आणि भविष्यात त्यामुळेच ग्रीन टॅब्युनलकडून (NGT) दंडपण आकारला जाईल. मी आपणास विनंती करतो की, MRTP व CRZ ACT प्रमाणे कारवाई करावी. अन्यथा मला MRTP ACT कलम 56 (A) अंतर्गत संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई संबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल. याची कृपया नोंद घ्यावी, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना इशारा! : मुंबईचा विकास व्हायलाच पाहिजे. परंतु पर्यटनमंत्र्यांच्या हट्टापायी मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा होत असेल तर ते खपवून घेतले जाणार ( Nitesh Rane Criticized Aaditya Thackeray ) नाही. पालिकेतील अधिकारी यांना हाताशी धरून अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप सुद्धा नितेश राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर याबाबत उचित कारवाई करावी. अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
