ETV Bharat / city

मुंबईसह पुणे, नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मंगळवारी राज्यात 7863 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Mar 2, 2021, 10:24 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मंगळवारी राज्यात 7863 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात होत आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये पुन्हा पूर्वीसारखी गर्दी दिसू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, चर्चगेट यांसारख्या स्थानकांवर पुन्हा प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत मंगळवारी 849 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा आतापर्यंतचा एकूण आकडा 3 लाख 27 हजार 619 वर पोहचला आहे. मंगळवारी 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा 11 हजार 476 वर पोहचला आहे. 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 5 हजार 639 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 9633 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 242 दिवस इतका आहे. मुंबईत एका महिन्यात रुग्ण दुप्पटीचा कालावधी 320 दिवसांनी कमी झाला आहे. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे 4 हजारांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा - मुंबईत मंगळवारी 849 नवे कोरोनाबाथित; 2 जणांचा मृत्यू

पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात ६८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन, पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ३ हजार ७९६ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत ४ हजार ८६४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान मंगळारी ४९८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर १ लाख ९३ हजार ८४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यात २४ तासात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर ८७७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या रुग्णांतील १.२० लाख रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत.

हेही वाचा - मुंबई महानगर प्रदेशातील डान्स बार, हुक्का पार्लर रडारवर; गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

नागपूर शहरात दिवसभरात ५९३, ग्रामीणला ९३ असे एकूण ६८६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ११ हजार १२६, ग्रामीण २६ हजार ७६० अशी एकूण १ लाख ३७ हजार ८८६ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण ९१.५२ टक्के आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.