मुंबई - पुण्याहून मुंबई राष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने शिवनेरी वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. तसेच दापोली-बोरिवली शिवशाही वातानुकूलित बसही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टी-1 डोमेस्टिक मार्गे सुरु केली आहे. शिवनेरीच्या दररोज स्वारगेट-विमानतळ-बोरिवली दरम्यान 18 फेऱ्या होणार असून, शिवशाही दापोली-विमानतळ-बोरिवली बसच्या दररोज 3 फेऱ्या होणार आहेत.
एसटी महामंडळाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक विमानतळ येथून पुण्याला जाण्यासाठी व दापोलीला जाण्यासाठी 16 डिसेंबरपासून सुरू केलेल्या शिवनेरी व शिवशाही बसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पुण्याहून व दापोलीहून सुद्धा विमानतळासाठी थेट सेवा सुरु केली आहे. स्वारगेट ते मुंबई राष्ट्रीय विमानतळ(शिवनेरी) तिकीट दर 525 रुपये तसेच दापोली ते मुंबई राष्ट्रीय विमानतळ (शिवशाही) तिकिटदर 480 रुपये इतका असणार आहे.
शिवनेरी वातानुकूलित स्वारगेट-विमानतळ- बोरिवली व दापोली-विमानतळ- बोरिवली, बसेसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
स्वारगेट वरून सुटण्याची वेळ सकाळी ५:०० वाजता व विमानतळ येथे पोहचण्याची वेळ ८:१५ याचप्रमाणे सुटण्याची व पोहोचण्याची वेळ पुढीलप्रमाणे आहे-
६ -९:१५, ७ - १०:१५; ८ -११:१५; ९ -१२:१५; १० -१३:१५; ११ -१४:१५; १२ -१५:१५; १३ -१६:१५; १४ -१७:१५; १५-१८:१५; १६ -१९:१५; १७ -२०:१५; १८ -२१:१५; १९ -२२:१५; २० -२३:१५; २१ -००:१५; २२ -१:१५.
दापोली -विमानतळ बोरिवली सुटण्याची व विमानतळ येथे पोहचण्याची वेळ-
६- १४ , १३:०० - २०:३०, २२:०० - ३:३०