ETV Bharat / city

मंदीत संधी: सप्टेंबरमध्ये राज्यात तब्बल 1 लाख 19 हजार 834 घरांची विक्री - Maharashtra Revenue News

कोरोना-लॉकडाऊनमुळे देशभरातील बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. बांधकाम व्यवसाय मंदीच्या खाईत अडकला आहे. पण आता मात्र हळूहळू बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहे. याचे उत्तम उदाहरण सप्टेंबरमधील मुद्रांक शुल्क आणि नोंदणीतून समोर आले आहे. घर विक्रीतून मुद्रांक शुल्क रूपाने राज्यातून 763 कोटींचा महसूल मिळाला आहे. यावरून अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान घर खरेदी-विक्रीला चांगले दिवस येऊ लागल्याचे चित्र आहे.

घर खरेदी-विक्रीला चांगले दिवस
घर खरेदी-विक्रीला चांगले दिवस
author img

By

Published : Oct 1, 2020, 1:23 PM IST

मुंबई - कोरोना-लॉकडाऊनमुळे देशभरातील बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. बांधकाम व्यवसाय मंदीच्या खाईत अडकला आहे. पण आता मात्र हळूहळू बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहे. याचे उत्तम उदाहरण सप्टेंबरमधील मुद्रांक शुल्क आणि नोंदणीतून समोर आले आहे. सप्टेंबरच्या मुद्रांक शुल्क-नोंदणी वसुलीच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत. तर यातून 763 कोटींचा महसूल मिळाला आहे. यात मुंबईतील 5 हजार 597 घरांचा समावेश असून यातून 180 कोटीचा महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कात कपात केल्याने मोठ्या प्रमाणात घर-खरेदी व्यवहाराला चालना मिळाल्याचे चित्र आहे.

विक्रीतून मुद्रांक शुल्क रूपाने मिळाला 763 कोटींचा महसूल

मुंबई, मुंबई महानगर प्रदेश हे घर खरेदी-विक्रीसाठी हॉटस्पॉट मानले जातात. त्यानुसार दर महिन्याला येथे मोठ्या संख्येने घर खरेदी-विक्री होते. तर राज्यातही घर खरेदी-विक्रीचा आलेख वाढता असतो. पण एप्रिलपासून कोरोना-लॉकडाऊनमुळे घर खरेदी-विक्रीला ब्रेक लागला आणि हे व्यवहार मंदावले. असे असले तरी, आता अनलॉकमध्ये बांधकाम व्यावसाय हळूहळू सावरू लागला आहे. खरेदी-विक्री व्यवहार वाढू लागले आहेत. नवीन प्रकल्प सुरू होऊ लागले आहेत. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुद्रांक शुल्क दरात राज्य सरकारने 2 ते 3 टक्क्यांनी कपात केली आहे. याचा ही चांगला परिणाम खरेदी-विक्री वाढण्यात होऊ लागला आहे. यातूनच सप्टेंबरमध्ये घरविक्रीत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात एकूण 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत. यातून सरकारला 763 कोटींचा महसुल मुद्रांक शुल्क-नोंदणी रूपाने मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुद्रांक शुल्क दरात 2 ते 3 टक्क्यांची कपात केली असताना हा महसूल मिळाला आहे. अन्यथा हा महसूल किमान दीड हजार कोटीच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा - महारेराचा ग्राहकाला दणका, घराची रक्कम भरण्यास विलंब केल्याने व्याज भरण्याचे आदेश

लॉकडाऊन फटका, घर खरेदी-विक्री व्यवसायात मंदी

लॉकडाऊनच्या आधी म्हणजेच फेब्रुवारी मध्ये 1 लाख 7 हजार 997घरे विकली गेली होती. तर यातून तब्बल 1 हजार 519 कोटींचा महसूल मिळाला होता. तर, मार्चमध्ये कोरोनाचा काळ सुरू झाला. पण त्याचा फटका मात्र एप्रिल, मे, जूनमध्ये बसला. कारण मार्चअखेरीस लॉकडाऊन लागला. त्याआधी बऱ्यापैकी व्यवहार झाले होते. त्यामुळेच मार्चमध्ये 85 हजार 003 घरे विकली गेली. तर, यातून 1 हजार 103 कोटींचा महसूल मिळाला होता. एप्रिलमध्ये मात्र घरविक्री आणि महसूल कितीतरी पटीने खाली आला. एप्रिलमध्ये राज्यात केवळ 778 घरे विकली केली होती. तर, यातून केवळ 3 कोटी 11 लाखांचा महसूल मिळाला होता. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यादांच इतका कमी महसुल राज्याला मिळाला होता आणि घरविक्रीही इतक्या कमी संख्येने झाली होती.

घर खरेदी-विक्रीला चांगले दिवस

जूनमध्ये मात्र हळूहळू विक्री वाढू लागली. त्यामुळेच जूनमध्ये 81, 276 घरे विकली गेली आणि त्यातूनच तब्बल 728 कोटी महसूल मिळाला. त्यानंतर महसुलात आणि विक्रीत वाढ होऊ लागली आहे. ऑगस्टमध्ये राज्यात 82 हजार 12 घरे विकली गेली आणि त्यातून 815 कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान 26 ऑगस्टला राज्यातील मुद्रांक शुल्क दरात 2 ते 3 टक्क्यांनी कपात करण्यात आली. परिणामी विक्री वाढली पण महसुलाची रक्कम मात्र कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत. यात मुंबईतील 5 हजार 597 घरांचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये 2 हजार 662 घरे विकली गेली होती. एकूणच आता घर खरेदी-विक्रीला चांगले दिवस आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - सावधान! ओसी नसलेल्या इमारतीत राहणे पडणार महागात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.