मुंबई - राज्य सरकारकडून 45 वर्षे वयावरील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत वीस लाख लोकांच्या दुसऱ्या डोससाठी त्वरित 20 लाख डोस देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यामध्ये लसीकरण, ग्लोबल टेंडरिंग आणि म्यूकरमायकोसिस या मुद्द्यावर चर्चा झाली. W H O ने मान्यता दिलेल्या लशीची पॉलिसी ठरवावी, असंही यावेळी आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सध्या थांबून राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत 45 वर्षे वयोगटातील लोकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले आहे. यासाठी राज्य सरकारकडे लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्रावर लोकांना दुसरा डोस मिळत नाहीये. यासाठी केंद्र सरकारने त्वरित वीस लाख डोसची व्यवस्था महाराष्ट्रासाठी करून द्यावी अशी मागणी आरोग्य मंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. तसेच 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी सरकारने खरेदी केलेले लस देखील दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याचं यावेळी राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले.
राज्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने समाधान
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने यावेळी आरोग्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांच्या वर गेली होती. मात्र आता हीच रुग्ण संख्या पाच लाख 46 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने आरोग्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रुग्ण बरा होण्याचा राज्याचा रिकव्हरी रेट 80 टक्के वर गेला होता. तो रिकव्हरी रेट आता 88.1 टक्क्यावर आला असल्याचा आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात 40 हजार पर मिलियन टेस्टिंग होत असून, आत्तापर्यंत राज्यामध्ये तीन कोटीच्या वर टेस्टिंग करण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातला रुग्ण संख्या कमी होत असली तरी, पश्चिम महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागा समोर ही रुग्णसंख्या थांबवण्याचा आव्हान असल्याचं आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले
सर्व राज्याचा एकत्रित ग्लोबल टेंडरिंग करावे
लसींची वाढती मागणी पाहता प्रत्येक राज्य स्वतंत्रपणे ग्लोबल टेंडर करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे एकाच कंपनीची लस ही देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या किमतीवर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात मिळून एकच ग्लोबल टेंडर करण्यात यावं, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच नॅशनल पॉलिसी फॉर इंपोर्टेड व्हक्सीन ठरवावी, अशी मागणी देखीक राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली.
राज्यासाठी वेगळ्या पोर्टलची मागणी
महाराष्ट्र राज्याच्या लसीकरणासाठी वेगळ पोर्टल काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री आंकडे केली. राज्यासाठी वेगळे पोर्टल असल्याने केंद्राकडून सुरु असलेल्या पोर्टल वर भार येणार नाही. तसेच राज्याचे पोर्टल हे केंद्राच्या पोर्टल सोबत लिंक आल्याने राज्याकडे असलेल्या पोर्टलची माहिती केंद्राकडे अपडेट होत राहील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशकात म्यूकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव वाढला, तीन रुग्णांचा मृत्यू, तर 150 जणांना बाधा