मुंबई - महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याचे माजी गृह निर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 2020 साली ठाण्यात सिविल इंजिनियर अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड ( NCP leader Jitendra Awhad ) यांनी त्यांच्या ठाण्याचा घरी नेऊन अमानुष मारहाण केली असल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला होता. याबाबत अपहरण आणि अमानुष मारहाण केल्याबद्दलची तक्रार नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री देखील होते.
ऑक्टोबर 2021 मध्ये जितेंद्र आव्हाड येणार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांना न्यायालयाकडून जामीन नाही मिळाला होता. या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय करून करण्यात यावा, अशी मागणी पीडित तरुणीने केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही मागणी भेटली होती. मात्र आता या प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाने जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ? : कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता. मात्र देशवासीयांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहानाला पाठिंबा दिला होता. त्यांनतर कासार वडवली येथील अनंत करमुसे या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. त्यानंतर या तरुणाने आव्हाडांचे एक अश्लील चित्रही सोशल माध्यमावर पोस्ट केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - Ajit Pawar on Ambadas Danve, अंबादास दानवेंची निवड स्वीकारली; अजित पवार स्पष्टच बोलले