ETV Bharat / city

शिमगा आणि धुळवड साधेपणाने साजरी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

author img

By

Published : Mar 26, 2021, 8:23 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या -प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा शिमगा उत्सव आणि धुळवड साधेपणाने साजरी करावी. विशेषतः कोकणात पालखीची मिरवणूक काढू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

शिमगा आणि धुळवड साधेपणाने साजरी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन
शिमगा आणि धुळवड साधेपणाने साजरी करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या -प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा शिमगा उत्सव आणि धुळवड साधेपणाने साजरी करावी. विशेषतः कोकणात पालखीची मिरवणूक काढू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

पालखीच्या मिरवणुकीला मनाई

शिमगा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा २८ मार्चला होळीचा सण आला आहे. मात्र राज्यात कोविडचा प्रादुर्भाव पाहाता, होळी आणि रंगपंचमी अगदी साधेपणाने साजरी करावी. कोकणात शिमग्यानिमित्त पालखीची मिरवणूक काढली जाते. मात्र यंदा घरोघरी पालखी नेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने त्यानुसार उपाययोजना कराव्यात. पालखी घरोघरी न नेता, मंदिरात दर्शनासाठी ठेवावी, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, शारीरिक अंतर राखावे, मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच, कोरोनामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना जून मध्ये परीक्षा देता येणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.